बंगालच्या उपसागरासह अंदमान समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ‘गज’ चक्रीवादळात झाले आहे. गज चक्रीवादळामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कुड्डालोरमध्ये दोन आणि थंजावूरमध्ये चार चणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तमिळनाडूमधील नागपट्टणमजवळ किनाऱ्याला धडकले. ताशी ८० ते ९० किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे आणि तुफान पावसामुळे किनाऱ्याजवळच्या भागात काहीशी पडझड झाली आहे. पुढील २४ तासांत गज चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. विशेषतः हे वादळ तामिळनाडूतील नागपट्टणम, कुड्डालोर आणि पाँडिचेरी येथील कराईकल येथील किनारपट्टीवर आहे. दरम्यान, किनारपट्टी भागातील ७६ हजार २९० लोकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती तामिळनाडू सरकारच्या वतीने देण्यात आली.

दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातून चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. २ महिन्यांपूर्वीच्या तितली वादळापेक्षा या चक्रीवादळाची तीव्रता मोठी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  चक्रीवादळात किनाऱ्यालगतच्या भागामध्ये ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. पुणे हवान विभागाच्या अंदाजानुसार, गज या चक्रिवादाळामुळे महाराष्ट्राच्य़ा काही भागात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडू शकेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

गज चक्रीवादळाची व्याप्ती कमी असल्यामुळे वादळ येऊन धडकेपर्यंत मोठा पाऊस आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा अनुभव नागपट्टणमच्या परिसरात आला नाही. रात्री नऊच्या सुमारास एकाएकी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली तेव्हा गज चक्रीवादळ किनाऱ्याजवळ आल्याची खात्री पटली. वादळ जमिनीवर येताच तमिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झाली. नागपट्टनमा येथे प्रचंड पाऊस आणि तुफान सुरुच आहे. गज चक्रीवादळामुळे मोठया प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गज चक्रीवादळ हे नागपट्टनमध्ये पोहोलचे आहे. किमान दोन तास हे चक्रीवादळ या भागात धडकले. दोन एक तासांत या चक्रीवादळात अनेक झाडे जमीनदोस्त झाले आहेत. दरम्यान, नौदलाची हेलिकॉप्टर्सही या मदत कार्यात सहभागी झाले आहेत.

तामिळनाडू सरकारने गुरुवार आणि शुक्रवारी किनारपट्टीलागतच्या सात जिल्ह्यांमधील शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. स्थानिक विद्यापीठांनी दोन दिवसांच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलले. गुरुवारी संध्याकाळी सहा ते शुक्रवारी सकाळी सहापर्यंत किनारपट्टी लगतच्या रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली.