हिमवादळाचा जोरदार तडाखा बसल्याने तापमान शून्य अथवा त्याहूनही अधिक घसरल्याने संपूर्ण अमेरिका गोठलेल्या अवस्थेप्रत झाली आहे. ‘वेस्टर्न न्यूयॉर्क’च्या बफेलो सिटी भागात झालेल्या मोठय़ा हिमवादळाने चौघांचा बळी घेतला आहे. गुरुवारीही बर्फाच्या वादळाचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.