News Flash

देशातील कट्टर शक्तींना केंद्र सरकारचा आश्रय- प्रकाश करात

केंद्र सरकारच्या आश्रयाखाली देशातील कट्टरतावादी शक्ती जोमाने वाढत आहेत

केंद्र सरकारच्या आश्रयाखाली देशातील कट्टरतावादी शक्ती जोमाने वाढत असून दादरी येथील घटना त्याचेच फलित असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश करात यांनी शनिवारी केला. या शक्ती मुस्लिम समाजाला लक्ष्य करत असून त्यांना गोवंश हत्येच्या नावाखाली समाजात ध्रुवीकरण घडवून आणायचे असल्याचे करात यांनी म्हटले. यावेळी करात यांनी परदेश दौऱ्यांच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींवर टीका केली. परदेशात असंख्य दौरे केलेत तरी देशात परकीय गुंतवणूक आणता येणार नाही. त्यासाठी देशाचा अंतर्गत विकास होणे, गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी दिल्लीपासून अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर दादरी येथे घरात गोमांसाचा साठा करून त्याचे सेवन करतात, अशी अफवा पसरल्याने मोहम्मद अखलख या व्यक्तीला जमावाने ठार मारले होते. या मारहाणीत अखलख यांचा २२ वर्षीय मुलगाही गंभीर जखमी झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 4:03 pm

Web Title: dadri incident an outcome of hardline forces cpm prakash karat
टॅग : Beef,Bjp
Next Stories
1 परदेशात जाणारे हिंदू गोमांस खातात; लालूंच्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधकांची टीका
2 दादरीत जाण्यापासून रोखल्याने अरविंद केजरीवाल संतप्त
3 दूध, भाज्या आणि फळांमध्ये कीटकनाशकांचे घातक प्रमाण; सरकारी अहवालातील धक्कादायक निष्कर्ष
Just Now!
X