News Flash

दादरी हत्याकांड : ‘ते’ मांस गाईचे नव्हते, पशुवैद्यकीय खात्याचा अहवाल

या प्रकरणाची सुनावणी ४ जानेवारी रोजी होणार आहे

Dadri lynching, beef , mutton, UP, Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
दादरी येथील मोहंमद अखलाक यांना घरात गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून जमावाने ठेचून मारल्याची नृशंस घटना २८ सप्टेंबर रोजी घडली होती.

देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या दादरी हत्याकांडप्रकरणी सोमवारी उत्तर प्रदेश सरकारकडून एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार मोहंमद अखलाख याच्या घरात सापडलेले मांस हे गोमांस नसून मटण असल्याचे स्पष्ट झाले. प्रथमदर्शनी पाहता मोहंमदच्या घरातील मांस हे शेळी किंवा तत्सम प्रजातीच्या प्राण्याचे असल्याचे या अहवालात सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात भाजपच्या नेत्याच्या मुलाचे नाव असून गुन्ह्य़ाची बव्हंशी जबाबदारी त्याच्याकडेच जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. ऊर्वरित आरोपींविरोधात दंगलीत सहभागी झाल्याचे गुन्हे नोंदविण्यात आले होते. आरोपपत्रात स्थानिक भाजप नेते संजय राणा यांचा मुलगा विशाल याचे नाव ठळकपणे अधोरेखित होत असल्याचे ग्रेटर नोएडाचे पोलीस अधीक्षक संजय सिंग यांनी सांगितले होते. या प्रकरणाची सुनावणी ४ जानेवारी रोजी होणार आहे.
दादरी येथील मोहंमद अखलाख यांना घरात गोमांस बाळगल्याच्या आरोपावरून जमावाने ठेचून मारल्याची नृशंस घटना २८ सप्टेंबर रोजी घडली होती. त्यांचा मुलगा दानिश या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. या घटनेमुळे देशातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 4:03 pm

Web Title: dadri lynching it was mutton not beef in akhlaq house says veterinary department
टॅग : Beef,Dadri Lynching
Next Stories
1 इबे आणि अॅमेझॉनवर गोवऱ्यांची विक्री!
2 माझा लढा जेटलींविरूद्ध नसून भ्रष्टाचाराविरूद्ध – कीर्ती आझाद
3 मोदींनी दिलेला फेटा शरीफ यांनी नातीच्या लग्नात डोक्यावर सजवला
Just Now!
X