आपण चीनकडून तिबेटचे स्वातंत्र्य मागितले नसल्याचे तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी सांगितले. दलाई लामा यांनी बुधवारी बराक ओबामा यांची भेट घेतली.
या भेटीबद्दल व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, या भेटीमुळे तिबेट संदर्भातील अमेरिकेच्या भूमिकेवर कोणताही परिणाम झालेला नाही. ओबामा यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात दलाई लामा यांनी चौथ्यांदा त्यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीमध्ये अन्य कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबद्दल कसलीही माहिती देण्यास अर्नेस्ट यांनी नकार दिला.
चीनशी आपली चर्चा लवकरच सुरू होईल, असेही यावेळी दलाई लामा यांनी ओबामा यांना सांगितल्याचे समजते.