News Flash

घृणास्पद: प्रेमप्रकरणामुळे दलित तरुणाला करायला लावलं किळसवाणं कृत्य

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

एका दलित व्यक्तीला जमिनीवरील थुंकी चाटायला लावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर त्याला जबरदस्तीने मूत्रही पाजण्यात आलं. बिहारमधील गया येथे हा घृणास्पद प्रकार घडला आहे. प्रेमप्रकरणामुळे दलित व्यक्तीला पंचायतकडून ही शिक्षा सुनावण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये पंचायतदरम्यान अनेक जण थुंकत असून दलित व्यक्तीला ते चाटण्यास लावलं जात आहे.

थुंकी चाटल्यानंतर दलित व्यक्तीला जबरदस्ती मूत्र पाजण्यात आलं. गया येथील वझीरगंज परिसरात हा प्रकार घडला आहे. दलित व्यक्तीचं प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर पंचायतीकडून ही शिक्षा सुनावण्यात आली होती. पीडित व्यक्ती महिलेसोबत पळून गेला होता. नंतर महिलेच्या कुटुंबीयांना त्यांना पकडून पंचायतसमोर हजर केलं होतं.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गया पोलिसांनी घटनेची दखल घेतली. गयाचे एसएसपी आदित्य कुमार यांनी याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय जे सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 1:44 pm

Web Title: dalit man forced to lick spit drink urine in gaya of bihar sgy 87
Next Stories
1 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण
2 कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव; हरिद्वारमध्ये दोन दिवसांत हजार जणांना संसर्ग
3 आळशी लोकांना करोनामुळे मृत्यूचा धोका जास्त; नव्या अभ्यासातील धक्कादायक माहिती
Just Now!
X