News Flash

आंतरजातीय विवाहातून गुजरातमध्ये दलिताची हत्या

गर्भवती पत्नीला आपल्या घरी नेण्यासाठी तिच्या आई-वडिलांशी वाटाघाटी करण्यास गेलेल्या या तरुणाला ठार मारण्यात आले

प्रतिनिधीक छायाचित्र

पोलीस पथकासमोरच घटना; आठ जणांवर गुन्हा

विवाहित दलित युवकाची पोलीस पथकासमोरच सासरच्या लोकांकडून हत्या झाल्याचे धक्कादायक प्रकरण अहमदाबादमधील वरमोर खेडय़ात उजेडात आले आहे. गर्भवती पत्नीला आपल्या घरी नेण्यासाठी तिच्या आई-वडिलांशी वाटाघाटी करण्यास गेलेल्या या तरुणाला ठार मारण्यात आले. हरेशकुमार सोळंकी असे त्याचे नाव असून तो मूळ कच्छचा होता. आंतरजातीय विवाहातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अभयम या ‘महिला हेल्पलाइन’ची मदत घेऊन या तरुणाने गर्भवती पत्नीस नांदण्यासाठी पुन्हा कच्छला पाठविण्याकरिता सासऱ्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता.  समुपदेशक भाविका हिने दिलेल्या माहितीनुसार ती सोमवारी सायंकाळी या युवकाबरोबर त्याच्या सासरच्या लोकांची समजूत काढण्यासाठी गेली होती. त्या वेळी महिला पोलिसांसमोरच आठ जणांनी  हरेशकुमार याच्यावर तलवारी, काठय़ा, चाकू व गजांनी हल्ला केला. सासरच्या घरासमोर सरकारी गाडीत तो बसलेला असताना हा प्रकार घडला. हत्येप्रकरणी आठ जणांसह मुलीचा पिता दशरथसिंह याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या आरोपींनी अभयम पथकावरही हल्ला केला. दरम्यान, सर्व आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून प्रत्यक्षदर्शीकडून  माहिती घेण्यात आली आहे, असे अनुसूचित जाती जमाती विभागाचे पोलीस उपअधीक्षक पी. डी. मनवर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 2:19 am

Web Title: dalit murdered in interracial marriage in gujarat
Next Stories
1 नरेश गोयल यांना परदेशात जाण्याची परवानगी नाकारली
2 कर्नाटकी नाटय़ संपेना..
3 अमेरिकी वस्तूंवरील भारताचे कर अस्वीकारार्ह : ट्रम्प
Just Now!
X