11 December 2017

News Flash

केरळमध्ये दलित विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार

रिक्षा निर्जन ठिकाणी नेऊन तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.

वृत्तसंस्था, तिरुअनंतपुरम | Updated: May 4, 2016 2:08 PM

( representative picture)

केरळमधील वारकला येथील अयानथी परिसरात एका १९ वर्षीय दलित विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी बी.एससी नर्सिंगची विद्यार्थिनी आहे. ती ओळखीच्या रिक्षाचालकाच्या रिक्षेतून प्रवास करत असताना रिक्षाचालकाने त्याच्या अन्य दोन मित्रांना रिक्षेत बसविले. त्यानंतर रिक्षा निर्जन ठिकाणी नेऊन तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. तिचे मदतीसाठीचे ओरडणे ऐकून तेथून जाणाऱ्या काही लोकांनी तिची मदत केली. मुलगी मानसिक तणावात असून तिला तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आधी घडलेल्या एका घटनेत केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात एका दलित विद्यार्थिनीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली होती.

 

First Published on May 4, 2016 2:03 pm

Web Title: dalit nursing student gangraped by 3 persons in kerala