22 September 2020

News Flash

केरळमध्ये आणखी एका दलित विद्यार्थिनीवर बलात्कार

एर्नाकुलम जिल्ह्य़ात विधि अभ्यासक्रमाच्या एका दलित विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण ताजे

| May 28, 2016 12:04 am

एर्नाकुलम जिल्ह्य़ात विधि अभ्यासक्रमाच्या एका दलित विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच परिचारिका अभ्यासक्रमाच्या एका १९ वर्षीय दलित विद्यार्थिनीवर वरकाला येथे सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
पीडित युवती बीएस्स्सीच्या (परिचारिका) दुसऱ्या वर्गात असून तिच्यावर एक रिक्षाचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी वरकालातील अयंती पुलावर मंगळवारी सामूहिक बलात्कार केला. तिला रुग्णालयातील अतिदक्षता विभागांत दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सदर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित युवतीचा दंडाधिकाऱ्यांसमोर बुधवारी जबाब नोंदविण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. तिने दिलेल्या जबानीनुसार आम्ही गुन्हा नोंदविला असून वैद्यकीय तपासणीत तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सदर रिक्षाचालक युवतीच्या परिचयाचा होता, त्याच्यासमवेत ती रिक्षातून गेली होती. थोडय़ा वेळाने रिक्षाचालकाचे दोन मित्रही रिक्षात बसले. त्यानंतर रिक्षा निर्जन स्थळी नेण्यात आली आणि या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.
सदर युवतीला जबर मानसिक धक्का बसला असून तिला अपस्माराचे झटके येत होते, वेदनेने विव्हळत मदतीसाठी तिने आरडाओरडा केला तेव्हा काही जणांनी तिला मदत केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 12:04 am

Web Title: dalit student gang raped in kerala
Next Stories
1 कागदपत्रे गहाळ केल्याप्रकरणी नोटरीला २५ हजारांचा दंड
2 आयएएस अधिकाऱ्यासह पाच जणांना कारावास व दंडाची शिक्षा
3 मैत्रिपूर्ण संबंधांसाठी दहशतवादाचा अडथळा दूर करा, मोदींनी पाकिस्तानला सुनावले
Just Now!
X