News Flash

सवर्ण मुलीवर प्रेम केल्यामुळे दलित तरुणाला बेदम मारहाण करुन ठार मारले

हैदराबादमधील घटना, मुलीच्या नातेवाईकांना अटक

हैदराबादमध्ये सवर्ण तरुणीवरील प्रेमसंबंधातून जबर मारहाण करीत या दलित तरुणाला ठार मारण्यात आले.

सवर्ण समाजातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याने एका महाविद्यालयीन १९ वर्षीय दलित तरुणाला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण करीत ठार मारल्याची खळबळजनक घटना हैदराबाद येथे घडली आहे. १० मार्च रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.

वाय. विजयकुमार (वय १९) हा विद्यार्थी हैदराबादमधील खजीपेठ भागातील साहित्य डिग्री कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याचे एका सवर्ण समाजातील १८ वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सुरुवातीला मुलीच्या पालकांना वाटले या दोघांमध्ये साधी मैत्री आहे. मात्र, काही दिवसांनंतर त्यांना कळाले की या दोघांमध्ये प्रेम जुळले असून ते रोजच भेटतात. विजयकुमारच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला असून त्याची आई शेतामध्ये मजूरीचे काम करते. विजयकुमार हा दलित समाजातील मुलगा असल्याचे मुलीच्या पालकांना माहिती होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी शेतात जाऊन त्याच्या आईला धमकावले होते.

दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनी मुलांच्या प्रेमसंबंधांना विरोध दर्शवला होता. मात्र, संबंधीत मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. आपल्याला विजयकुमारशीच लग्न करण्यावर ती ठाम होती. त्यामुळे चिडलेल्या मुलीचे वडिल महेश रेड्डी आणि चुलते संबविसा रेड्डी यांनी विजयकुमारला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार, आम्हाला मुलाला भेटायचे असून त्याला फोन करुन घरी बोलवण्यास सांगितले. त्यानुसार, मुलीने विजयकुमारला घरी बोलावले १० मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो मुलीच्या घरी पोहोचला.

त्यानंतर विजयकुमारला घराच्या गच्चीवर नेऊन मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने त्याला शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. यावेळी त्याने आपले तुमच्या मुलीवर प्रेम असून तीच्याशीच लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगितले, त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्याच्या डोक्यात जाड लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. हा सर्व प्रकार मुलीच्या समोर घडला. या जबर मारहानीत विजयकुमार जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह त्यांनी रेल्वे ट्रॅकवर नेऊन टाकला, कारण ही आत्महत्या आहे असा समज व्हावा. त्यानुसार, रेल्वे पोलिसांनाही सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे वाटले होते.

मात्र, विजयकुमारच्या आईने मुलगा हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची ओळखही पटली. त्यानंतर, मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने आपल्याला शेतात येऊन धमकावल्याचे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले. त्यानंतर, पुढील तपासात त्याचे प्रेमप्रकरण आणि सर्व घडामोडी उघड झाल्या. त्यानंतर मुलीच्या वडिलांना आणि चुलत्याला पोलिसांना ताब्यात घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2018 4:39 pm

Web Title: dalit youth beaten to death over affair girls kin arrested says police
Next Stories
1 भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पाकिस्तानने उच्चायुक्तांना माघारी बोलावले
2 धैर्याला सलाम ! वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही त्याने दिला दहावीचा पेपर, नंतर केले अंत्यसंस्कार
3 भांडवलवादी पक्षांना सत्तेत येण्यापासून रोखायला हवे : मायावती
Just Now!
X