07 August 2020

News Flash

आदेश डावलणाऱ्या पोलिसांना समन्स – सर्वोच्च न्यायालय

न्यायालयाने सुधारित आदेशांच्या पालनासाठी डान्स बार मालकांना तीन दिवस मुदत दिली होती.

| April 19, 2016 03:24 am

डान्स बार परवाने प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

महाराष्ट्र सरकारने डान्स बारना दहा दिवसात परवाने देण्याच्या आदेशाचे पालन केले नाही त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आता आमच्यासमोर हजर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

न्या. दीपक मिश्रा व न्या. शिवकीर्ती सिंग यांनी सुनावणीवेळी सांगितले की, सक्षम पोलीस उपायुक्तांनी डान्स बारना परवाने देणे अपेक्षित होते त्यांनी २५ एप्रिलला न्यायालयसमोर हजर राहावे. तुम्ही इतके दिवस काय केले. परवान्यांची तारीख निश्चित केली होती, तुम्ही आमच्या सुधारित आदेशाचे पालन केले नाही. अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार काम केले पाहिजे. वरिष्ठ वकील जयंत भूषण यांनी हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनची बाजू मांडली. त्यात महाराष्ट्र सरकारने डान्स बारना काही अटींवर परवाने देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयाने बोलावून घ्यावे, अशी मागणी भूषण यांनी केली होती.

अतिरिक्त महाधिवक्ता पिंकी आनंद यांनी सांगितले की, सरकारला न्यायालयाच्या आदेशावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास वेळ देणे गरजेचे आहे. त्यावर न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. न्यायालयाने सुधारित आदेशांच्या पालनासाठी डान्स बार मालकांना तीन दिवस मुदत दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2016 3:24 am

Web Title: dance bar issue supreme court slam on police
टॅग Supreme Court
Next Stories
1 लैंगिक समानता हा ‘घटनात्मक संदेश’; सर्वोच्च न्यायालयाचे मत
2 चीनने दहशतवादाबाबात भूमिका बदलणे गरजेचे
3 काश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर, मोबाईल इंटरनेट सेवा सुरू
Just Now!
X