प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार विजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा तालिबानी आणि अफगाणिस्तानच्या लष्करात झालेल्या चकमकीवेळी मृत्यू झाला. दानिश यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी दानिश सिद्दीकी यांना भारतीय असल्याचं कळाल्यानंतर मारण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातच आता अफगाण लष्कराकडून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. दानिश सिद्दीकी हे तालिबान्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मरण पावले नाही, तर त्यांना तालिबान्यांनी पकडलं होतं आणि त्यानंतर त्यांना मारण्यात आलं, अशी माहिती अफगाण लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. इंडिया टुडेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानामधील हिंसेचे वृत्तांकन करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांच्या हत्येबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. दानिश सिद्दीकीला तालिबानी दहशतवाद्यांनी जिवंत पकडले. यानंतर, दानिश सिद्दीकींची ओळख पटवल्यानंतर तालिबान्यांनी त्याची निर्घृण हत्या केली. अफगाणिस्तान राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा दलाचे प्रवक्ते अजमल ओमर शिणवारी यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

“दानिश सिद्दकीचा मृत्यू साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होवो यासाठी देवाकडे प्रार्थना करतो”; अभिनेत्याचं ट्विट

“दानिश सिद्दीकी यांचं अपहरण करण्यात आलं वा पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निघृर्णपणे हत्या करण्यात आली. हे प्रकरण सध्या तपासात आहे. दानिश यांची ज्या भागात हत्या करण्यात आली, तो परिसर तालिबान्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे साक्षीदार शोधण्यासाठी वेळ लागत आहे”, असं अजमल ओमर शिणवारी यांनी म्हटलं आहे. “तालिबानला पाकिस्तानकडून रसद पुरवली जात आहे. ज्या भागावर कब्जा केल्याचं तालिबान सांगत आहे, तो दावा खोटा आहे. तालिबानशी अफगाणिस्तान सरकार लढत आहे आणि या प्रॉक्सी वॉरमागे पाकिस्तान आहे”, असं शिणवारी म्हणाले.

व्यक्तिवेध » दानिश सिद्दीकी… ‘नरेचि केला हीन किती नर’ ही अवस्था टिपणारा

दानिश सिद्दीकी यांच्या मृत्यूबद्दलची माहिती समोर येत असून, या सर्व माहितीत दानिश यांची तालिबानने हत्या केल्याचं म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वी अफगाण लष्करात कमांडर असलेल्या बिलाल अहमद यांनी दानिश सिद्दीकीसोबत तालिबान्यांनी केलेल्या क्रूर कृत्याबद्दल माहिती दिली होती. “तालिबानी घुसखोरांनी दानिश सिद्दीकीचा अनादर केला. तालिबानी भारतीयांचा तिरस्कार करतात. त्यामुळेच त्याच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली”, असं बिलाल अहमद म्हणाले होते.

दानिश सिद्दीकीची ओळख पटवल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांकडून हत्या; अमेरिकन मासिकाचा दावा

“पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या स्पिन बोल्डक शहराच्या परिसरात तालिबानी आणि अफगाण लष्कराची चकमक झाली. यावेळी तालिबान्यांनी लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह दानिशलाही गोळ्या घातल्या. दानिश भारतीय नागरिक असल्याचं जेव्हा तालिबान घुसखोरांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी दानिशच्या डोक्यावरून गाडी घातली. दानिश मेलेला आहे, हे माहिती असतानाही त्यांनी हे कृत्य केलं”, कमांडर बिलाल अहमद यांनी म्हटलं होतं.