‘भारत माता की जय’ या घोषवाक्यावरून सुरू असलेल्या वादात आता मुस्लिमांची प्रमुख धर्मसंस्था असलेल्या दारुल उलूम देवबंदने उडी घेतली आहे. ‘भारत माता की जय’ ही घोषणा इस्लामविरोधी असून कोणत्याही मुस्लिमाने ही घोषणा देऊ नये, असा फतवा दारुल उलूमने काढला आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी तापण्याची दाट शक्यता आहे.

‘भारत माता की जय’ म्हणण्याची सक्ती नको

आमच्या देशावर आमचे प्रेम आहे, पण देश हा आमचा देव नाही. इस्लाम फक्त एकाच देवाला मानतो. त्यामुळे मुस्लिमांनी भारत मातेचा जयजयकार करणे इस्लामविरोधी ठरते, असे दारुल उलूमचे म्हणणे आहे.

मेहबुबा मुफ्ती ‘भारत माता की जय’ म्हणणार का? – संजय राऊतांचा संघाला सवाल

यापूर्वी वंदे मातरमवरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वंदे मातरमची सक्ती करण्यात आली होती. आता भारत माता की जय म्हणण्याची सक्ती केली जात आहे, हे दोन्ही प्रकार एक सारखेच आहेत. आमचे पूर्वज देखील याच मातीत जन्मले. त्यामुळे भारत हा आमचा देश आहे यात काहीच शंका नाही. मात्र, देश हा आमचा देव आहे असं आम्ही मानू शकत नाही, असेही दारुलने आपल्या फतव्यात नमूद केले आहे.