News Flash

प्रायव्हसीच्या मुद्यावरून व्हॉट्स अँपला आयर्लंडमध्ये २२५ दशलक्ष युरोचा दंड

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्स अँपला आयर्लंडमध्ये मोठा झटका बसला आहे

WhatsApp fined a record 225 mln euro by Ireland over privacy
आयर्लंडच्या प्रायव्हसी वॉचडॉगने हा दंड ठोठावला

इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्स अँपला आयर्लंडमध्ये मोठा धक्का बसला आहे. फेसबुक आणि इतर कंपन्यांसोबत लोकांचा वैयक्तिक डेटा शेअर केल्याची चौकशी केल्यानंतर व्हॉट्स अँपला गुरुवारी विक्रमी २२५ दशलक्ष युरो दंड ठोठावण्यात आला. आयर्लंडच्या प्रायव्हसी वॉचडॉगने हा दंड ठोठावला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्स अँपने सांगितले की दंड पूर्णपणे विसंगत आहे आणि कंपनी याविरोधात अपील करेल. युरोपियन लोकांची वैयक्तिक माहिती कशी गोळा केली आणि कशी वापरली हे आयोगाला सांगण्यात व्हॉट्स अँप अपयशी ठरले आहे. व्हॉट्स अँपवर फेसबुक आणि इतर कंपन्यांसोबत वापरकर्त्याची माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. निर्णयाचा एक भाग म्हणून, नियामकांनी व्हॉट्स अँपला युरोपच्या गोपनीयता कायद्यातील विविध तरतुदी लागू करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

व्हॉट्स अँप प्रवक्त्याचे म्हणणे आहे की, ते सुरक्षित आणि प्रायव्हसी प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. आम्ही पुरवलेली माहिती पारदर्शक आणि सर्वसमावेशक आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही काम केले आहे आणि असेच करत राहू. २०१८ मध्ये लोकांना देण्यात आलेल्या पारदर्शकतेबद्दल आजच्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही आणि दंड पूर्णपणे विसंगत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2021 8:55 pm

Web Title: data privacy watchdog fines whatsapp 225 mln euros by ireland srk 94
Next Stories
1 यंदाही घरीच सण साजरे करा, नाहीतर…; करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा इशारा
2 Maratha Reservation : राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी घेतली पत्रकारपरिषद, म्हणाले…
3 बाग्राम एअरबेसवर चीनची नजर; अमेरिकेच्या माजी राजदूताने भारताला दिला इशारा
Just Now!
X