28 January 2021

News Flash

मामासोबत प्रेमसंबंध, भाचीने आई-वडिलांसह ८ जणांवर केला विषप्रयोग

आई-वडिलांसह कुटुंबातील ८ सदस्यांच्या रात्रीच्या जेवणामध्ये विषप्रयोग

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

एका मुलीने आपल्याच कुटुंबातील आठ जणांवर विषप्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मामासोबतच्या प्रेमसंबंधांमध्ये कुटुंबीयांचा अडथळा येत असल्याने तिने हे कृत्य केले. रात्रीच्या जेवणामध्ये विषप्रयोग करुन तिने आई-वडिलांसह कुटुंबातील ८ सदस्यांना मारुन टाकण्याचा प्रयत्न केला.

उत्तर प्रदेशच्या कौशंबी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथे आपल्या नात्यात कुटुंबीयांचा अडथळा येत आहे असे लक्षात आल्यानंतर मामा-भाचीने कुटुंबीयांना मारण्याचा कट रचला. रात्रीच्या जेवणामध्ये भाचीने विषप्रयोग करुन आपल्याच कुटुंबातील ८ सदस्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि रात्रीतून मामासोबत घरातून पळ काढला. यावेळी त्यांनी घरातील दागिनेही चोरले.

सकाळी उठल्यावर बराच वेळ झाला तरी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजारच्यांना संशय आला, त्यावेळी घरातील सदस्य बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलीस तपास सुरू असून मुलगी व तिच्या मामाचा शोधही सुरू आहे, लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचू अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 12:04 pm

Web Title: daughter mix poison in food for love with uncle
Next Stories
1 धक्कादायक : रडणाऱ्या भारतीय बाळाला विमानाबाहेर फेकण्याची ब्रिटिश एअरवेजच्या कर्मचाऱ्याची धमकी
2 शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी, इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स ३८ हजारांवर
3 जम्मू-काश्मीरमध्ये अजून एका दहशतवाद्याचा खात्मा, एकूण ५ जणांना कंठस्नान
Just Now!
X