भारताचा सर्वात मोठा शत्रू मोस्ट वॉंटेड दाऊद इब्राहिम भारत सोडून पळून तर गेला मात्र जगातील वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं काळं साम्राज्य सुरू आहे. दाऊदने रिमोट कंट्रोल प्रमाणे पाकिस्तानच्या कराचीमध्ये बसून भारतातील काळेधंदे सुरू ठेवले आहेत. दाऊद इब्राहिम कराचीच्या उच्चभ्रू पॉश क्लिफ्टन परिसरातील आपल्या सेफ हाऊसमध्ये सुरक्षित असतो. सार्वजनिकरित्या तो कधी समोर येत नाही, पण पहिल्यांदाच परदेशातील आपल्या व्यवसायाबाबत चर्चा करतानाचा त्याचा फोन कॉल समोर आला आहे. २०१४ मधील हा फोन कॉल आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलंय. यानुसार, ८० च्या दशकात भारतातून पळालेल्या दाऊदने आता जगभरात आपलं मोठं साम्राज्य उभं केल्याचं या कॉलवरुन स्पष्ट होतंय. जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी दाऊद त्याच्या डी कंपनीचा विस्तार करतोय. कराचीमध्ये बसून तो रिमोट कंट्रोल प्रमाणे दुबईतल्या ‘अल हमरिया पोर्ट’च्या इमारतीतून इंटरनेशनल क्रिमिनल नेटवर्क चालवतो. दाऊदकडे एकूण ६.७ अब्ज डॉलर संपत्ती असण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

या फोनवर दाऊद दुबईतील रियल इस्टेट व्यवसायाबाबत चर्चा करतोय. दुबई हे डी कंपनीच्या सर्व काळ्या साम्राज्याचं मुख्य केंद्र मानलं जातं. बिझनेस एजंट यासिरसोबत चर्चा करत असतानाचा हा फोन कॉल आहे. यामध्ये विविध मोठमोठ्या गुंतवणूकीबाबत दाऊद बोलत आहे. दुबईतील आलिशान प्रकल्प ‘अल खेल हाइट्स’ यातील गुंतवणुकीबाबत तो यासिरसोबत चर्चा करत असतानाचा हा कॉल आहे. 2014 मध्ये इंटसेप्ट केलेल्या या कॉलमध्ये दाऊद इब्राहिम यासिरला एक एस्क्रो अकाउंट बनवण्याबाबत सांगत आहे. एस्क्रो अकाउंट म्हणजे खरेदी करणारा आणि विक्रेता आपली रीयल इस्टेटची डील पूर्ण होईपर्यंत फंड्स यामध्ये ठेवू शकतात.

दाऊद आणि यासिरमधील चर्चा –
यासिर – ‘मैंने इरफान को बताया है कि मुझे आज दुबई लैंड डिपार्टमेंट से कॉल आया था.’
दाऊद- ‘ठीक है, सही है, और क्या हाल है मार्केट का, क्या पोजिशन है?’
यासिर- ‘अभी तक तो सही है. मार्केट स्ट्रॉन्ग है अभी. इस महीने में हो ये रहा है कि लोग अच्छा माल बेच नहीं रहे हैं.’
दाऊद – ‘पहले मैं वो ट्रांसफर का मामला एस्क्रो अकाउंट का…मालूम कर लूंगा कि हो सकता है या नहीं…जो चीजें पूछीं हैं उन पर बात कर लूंगा मैं.’
यासिर – ‘दरअसल, सिटी स्पेस में हमारा स्टैंड भी था, जिसमें हमने अल खेल हाइट्स के बड़े बड़े पोस्टर भी लगाए थे.तो आज उन्होंने फोन करके पूछा कि आप क्या अल खेल हाइट्स को बेच रहे हो…उन्होंने कहा कि मिराज (रियल्टर्स) की तरफ से हमें कोई जानकारी नहीं है. तो कल हम उन्हें दस्तावेज दिखाने के लिए ले जा रहे हैं.’
दाऊद- ‘अच्छा…तो मिराज के दस्तावेज को तुमने अपने साथ ले लिया है ना.’
यासिर- ‘जी, मिराज से दस्तावेज टेक्सचर ने लिए हैं. टेक्सचर से हमने लिए हैं.’
दाऊद – ‘ठीक…इसमें किसका नाम आएगा (मीडिया प्लान में).’
यासिर- ‘मैंने इरफान भाई को मीडिया प्लान के बारे में बताया था…उनका ये कहना था कि ‘डेवलप्ड बाई मिराज, अल खेल हाईट्स एंड टेक्सचर होल्डिंग’ लिखा जाए.’ और किसी का नहीं डालेंगे. बस ये है की वो नम्बर डालना जरुरी है.’
दाऊद- ‘फोन नम्बर ना.’
यासिर- ‘जी जी फोन नम्बर…फिर वही वाला डालना पड़ेगा.’
दाउद- ‘ठीक है…’
यासिर- ‘भाई आप कह रहे थे ना कि आपके भी लिंक…कुछ जानने वाले हैं जो बिल्डिंग में इंटरेस्टेड हैं. तो आप उनसे कह सकते हैं.’
दाऊद- ‘बिल्कुल कह दूंगा.’