News Flash

दाऊद पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा

डी कंपनीचा प्रमुख सध्या हद्दपार होऊन पाकिस्तानात असलेला भारतीय मुसलमान दाऊद इब्राहिम हा आहे.

| July 5, 2019 12:53 am

दाऊद इब्राहिम

इस्लामाबाद : १९९३ साली मुंबईत भीषण मालिका बॉम्बस्फोट केल्यानंतर देशत्याग केलेला गँगस्टर दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात असल्याची माहिती ब्रिटनमधील एका न्यायालयाला देण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवशी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद हा पाकिस्तानात नाही, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने गुरुवारी ठासून सांगितले.

याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता, ‘दाऊद इब्राहिम पाकिस्तानात नाही’, असे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी सांगितले.

‘डी कंपनीचा’ (दाऊद गँग) वरिष्ठ सदस्य असलेल्या ५१ वर्षांच्या जबीर मोती याच्यावर लंडनच्या वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात सध्या प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे. बुधवारी या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, २०० लोकांचे बळी घेणाऱ्या मुंबई बॉम्बस्फोटांसाठी हवा असलेला दाऊद हा सध्या पाकिस्तानात असल्याचा उल्लेख झाला.

‘डी कंपनीचा प्रमुख सध्या हद्दपार होऊन पाकिस्तानात असलेला भारतीय मुसलमान दाऊद इब्राहिम हा आहे. १९९३ साली २०० लोकांचे बळी घेणारे साखळी बॉम्बस्फोट मुंबईत झाले, तेव्हापासून दाऊद व त्याचा भाऊ आणि वरिष्ठ साथीदार अनिल इब्राहिम हे भारतातून फरार आहेत’, असा अमेरिकेच्या अ‍ॅटर्नीनी प्रत्यार्पणाबाबत केलेल्या शपथपत्रातील भाग मोती याचे बॅरिस्टर एडवर्ड फिझगेराल्ड यांनी वाचून दाखवला. जबीर मोतीवाला हाही डी कंपनीतील वरिष्ठ साथीदार असून तो थेट दाऊदला ‘रिपोर्ट’ करतो असे तपासात आढळले आहे, असाही यात उल्लेख होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:53 am

Web Title: dawood ibrahim not in pakistan say foreign office zws 70
Next Stories
1 आयएनएक्स मीडिया प्रकरणात माफीची साक्षीदार होण्याची इंद्राणी मुखर्जीला परवानगी
2 काँग्रेसतर्फे ट्विटरवर रा. स्व. संघविरोधी व्हिडीओ
3 ‘टिकटॉक’वरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
Just Now!
X