News Flash

मुलामुळे दाऊद इब्राहिम होता नैराश्यात

घराजवळच्या एका मशिदीत मोईन पत्नी आणि तीन मुलांसह राहतो

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मुलामुळे नैराश्यात होता, अशी माहिती त्याचा भाऊ इकबाल कासकरने पोलीस चौकशीत दिली. मुलाने घर सोडून मशिदीत जाण्याचा निर्णय घेतल्याने आता व्यवसाय कोण सांभाळणार याची चिंता दाऊदला वाटत होती,  अशी माहिती समोर आली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला ठाण्यातील खंडणीविरोधी पथकाने बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती. पोलीस चौकशीत इकबालने दाऊदबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले. यात दाऊदच्या मुलाबाबत दिलेल्या माहितीचाही समावेश आहे.

दाऊदचा मुलगा मोईन नवाझ कासकर (वय ३१) हा दाऊदच्या अवैध धंद्यांविरोधात होता. मोईनने कराचीतील दाऊदच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. घराजवळच्या एका मशिदीत मोईन पत्नी आणि तीन मुलांसह राहतो, असे इकबालने पोलिसांना सांगितले. मशिदीत येणाऱ्या लहान मुलांना कुराणचे महत्त्व सांगणे आणि इस्लाम धर्माची माहिती देण्याचे काम तो करतो. कराचीतील दिग्गज मौलानांमध्ये त्याचा समावेश होतो, असे सांगितले जाते. सध्या दाऊद त्याच्या मुलाच्या संपर्कात आहे का, याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

मुलाने धार्मिक मार्ग स्विकारल्याने दाऊदच्या चिंतेत भर पडली होती. माझ्यानंतर माझा व्यवसाय कोण सांभाळणार याची चिंता त्याला वाटत होती. यामुळे तो काही काळ नैराश्यात होता, असे इकबालचे म्हणणे आहे. दाऊदच्या दोन मुली असून यातील एका मुलीचा विवाह जावेद मियादाद यांच्या मुलाशी तर दुसऱ्या मुलीचा विवाह अमेरिकेतील व्यावसायिकाशी झाला आहे. माझ्यानंतर माझा मुलगा ‘डी कंपनी’ आणि अन्य व्यवसायांची धुरा हाती घेईल, असे दाऊदला वाटत होते. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम हा देखील प्रकृती अस्वास्थ्यामुळे अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ शकता नव्हता, असे इकबालने म्हटले आहे. इकबाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 3:35 pm

Web Title: dawood ibrahim suffering from depression after son moin nawaz d kaskar maulana thane police extortion cell
Next Stories
1 नोटाबंदीनंतर २५ लाखांहून अधिक रक्कम जमा करणाऱ्यांना आयकर विभागाची नोटीस
2 देशभक्ती जागृत करण्यासाठी वसतिगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती
3 आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना सीबीआयच्या विशेष संचालकपदी कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय
Just Now!
X