News Flash

अग्निदुर्घटनेनंतर सीरमने आज तीन देशांना पाठवला ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा

काल पुण्यातील सीरमच्या प्रकल्पातील एक इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची एक इमारत गुरुवारी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. इमारतीचे बांधकाम सुरु होते. या आगीमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या आगीमुळे ‘कोव्हिशिल्ड’ लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. सध्या सर्वांचेच लक्ष या जीवरक्षक लसीकडे लागले आहे.

देशात शनिवारपासूनच लसीकरणाला सुरुवात झालीय. आतापर्यंत लाखो लोकांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत. पुण्यातील या अग्नि दुर्घटनेनंतर आज सीरम इन्स्टिट्यूटने म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा पाठवून दिला.

अदर पूनावाला काय म्हणाले?
सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली आहे. याच ट्विटमध्ये त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

“आज SII साठी अत्यंत दु:खद दिवस आहे. आम्हाला अतिशय दुःख झाले आहे आणि मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. नियमानुसार या कुटंबांनी जी मदत मिळायची आहे ती मिळेलच, मात्र त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक कुटुंबास २५ लाखांची मदत देत आहोत.” असं सायरस पुनावाला यांनी जाहीर केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 9:26 am

Web Title: day after fire serum institute dispatches vaccines for myanmar seychelles mauritius dmp 82
Next Stories
1 तिसरी बार मोदी सरकार…आज निवडणूक झाली तर असे असतील निकाल
2 शिवमोगामध्ये शक्तीशाली स्फोट, आठ मजुरांचा मृत्यू, ३० किमी परिसरातील खिडक्यांच्या काचा फुटल्या
3 बायडेन यांची १५ कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी
Just Now!
X