24 November 2020

News Flash

अतिक्रमणाची चाल करण्याआधी चीनने लडाखजवळ तैनात केली J-20 फायटर विमाने

H-6 बॉम्बर विमानाचे वैशिष्टय म्हणजे ही विमाने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत....

पूर्व लडाखमधील पँगाँग टीएसओ क्षेत्रातील दक्षिण किनाऱ्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चीनने ही लष्करी चाल करण्याआधी ‘होतान’ एअरबेसवर J-20 ही पाचव्या पिढीची अत्याधुनिक फायटर विमाने पुन्हा तैनात केली. ‘होतान’ हा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा लडाख सीमेपासून जवळ असलेला हवाई तळ आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

२९-३० ऑगस्टच्या रात्री पँगाँग टीएसओ तलावाच्या दक्षिण किनाऱ्याजवळ चिनी सैन्याच्या आक्रमक हालचाली दिसून आल्या. त्यानंतर भारतीय सैन्याने तातडीने पावले उचलत चीनचा नव्या भागातील घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

आणखी वाचा- सीमेवर मोठा तणाव: श्रीनगर-लेह महामार्ग नागरिकांसाठी बंद

चीनने ‘होतान’ एअर बेसवर J-20 फायटर विमानांची तैनाती केल्यापासून लडाख आणि आसपासच्या प्रदेशातील भारतीय सीमांजवळ या विमानांची उड्डाणे सुरु आहेत. मागच्या महिन्यात काशगर एअर बेसवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने H-6 बॉम्बर विमाने तैनात केल्याचे उपग्रह फोटोंवरुन समोर आले होते.

आणखी वाचा- पँगाँग टीएसओमध्ये चीनचा डाव उधळला, लडाखमधलं ८ फिंगर्स म्हणजे नक्की काय जाणून घ्या…

काशगर एअर बेसवर सहा शियान H-6 बॉम्बर विमाने चीनने तैनात केली आहेत. दोन विमानांमध्ये पेलोड म्हणजे शस्त्रसज्ज आहेत. फास्ट मेल न्यूजने हे वृत्त दिले होते. H-6 बॉम्बर विमानाचे वैशिष्टय म्हणजे ही विमाने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत. लडाखपासून ६०० किमी अंतरावर हा विमानतळ आहे. सहा हजार किलोमीटर हा H-6 विमानांचा पल्ला आहे. त्याशिवाय १२ शियान JH-7 फायटर बॉम्बर आणि चार J11 / 16 फायटर विमाने तैनात केली आहेत.

आणखी वाचा- चीनकडून नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा आगळीक, भारतीय लष्कराने दिला इशारा

कसे आहे J-20 फायटर विमान?

– चीन J-20 पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर विमान असल्याचा दावा करतो. पण त्याबद्दल शंका आहे. कारण याआधी भारताच्या सुखोई फायटर विमानांच्या रडार्सनी J-20 च्या हालचाली टिपल्या आहेत.

– चीनच्या J-20 आणि JF-17 ची अजून युद्धभूमीत परिक्षाच झालेली नाही.

– विनाशस्त्रास्त्र J-20 चे वजन १९ हजार किलोपेक्षा जास्त आहे. हे विमान ३७,०१३ किलोपर्यंत भार वाहू शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 2:04 pm

Web Title: days before fresh clashes china redeployed j 20 jets near ladakh dmp 82
Next Stories
1 अखेर १३ दिवसांनी अमित शाह यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
2 गौतम अदानी म्हणतात; Mumbai, the city of Dreams!
3 सीमेवर मोठा तणाव: श्रीनगर-लेह महामार्ग नागरिकांसाठी बंद
Just Now!
X