25 February 2021

News Flash

सिंगापूरमधील कर्मचाऱ्याने फेसबुकवर लिहिलं ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, गमवावी लागली नोकरी

सिंगापूरमधील डीबीएस बँकेत काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला राष्ट्रध्वजाचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे

सिंगापूरमधील डीबीएस बँकेत काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला राष्ट्रध्वजाचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याने आपली नोकरी गमवावी लागली आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाला कर्मचाऱ्याने फेसबुकवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये सिंगापूरचा राष्ट्रध्वज फाटलेला दाखवत आतमध्ये तिरंगा असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

अविजीत दास पटनाईक असं या कर्मचाऱ्याचं नाव असून त्याने 14 ऑगस्टला हा फोटो शेअर केला होता. फेसबुकवरील सिंगापूर इंडियन्स अॅण्ड एक्सपॅट्स ग्रुपवर हा फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोमध्ये एका टी-शर्टवर सिंगापूरचा राष्ट्रध्वज फाटलेला दाखवत आतमध्ये तिरंगा दाखवण्यात आला होता. या फेसबुक ग्रुपमध्ये 11 हजार सदस्य आहेत.

अविजीत दास पटनाईक अनेक वर्षांपासून सिंगापूरमध्ये वास्तव्य करत आहेत. या फोटोला त्यांनी ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, असं कॅप्शनही दिलं होतं. या पोस्टनंतर अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त करत हे अत्यंत आक्षेपार्ह असून सिंगापूरचा अपमान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाऊ लागली.

यानंतर डीबीएस बँकेने स्पष्टीकरण देत आपण सिंगापूरचे नागरिक असलो, तरी ह्रदयाने भारतीय आहोत असं त्यांना सांगायचं होतं असं सांगितलं. मात्र फोटो आक्षेपार्ह असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तो काढला. नंतर बँकेने पत्रक जारी करत अविजीत आता आमचे कर्मचारी नसल्याचं जाहीर केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 8:17 pm

Web Title: dbs employee lost job for posting image of torn singapore flag
Next Stories
1 ‘पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी नाही’ या राहुल गांधींच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणतात…
2 ‘आणीबाणीची घोषणा होणार आहे’; डाव्या विचारवंतांच्या अटकेवर अरुंधती रॉय यांची प्रतिक्रिया
3 केरळमधील मंत्र्याचा ‘बाहुबली’ अवतार, पूरग्रस्तांसाठी खांद्यावरुन वाहून नेलं सामान
Just Now!
X