News Flash

डास चावल्याने मृत्यू झाल्यास अपघाती विम्याअंर्गत दावा करता येणार नाही: सर्वोच्च न्यायालय

किटक चावल्याने झालेला आजार विमा सुरक्षेअंर्गत येत नाही

मलेरिया झालेला मृत्यू अपघात नाही

नैसर्गिक अधिवासामध्ये एखाद्या किड्याच्या चावण्याने किंवा त्याच्या माध्यमातून आलेल्या जंतूंमुळे झालेले रोग हे विम्याअंतर्गत येत नाहीत असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायलयाने दिला आहे. न्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड आणि हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला. कोणत्या नैसर्गिक परिस्थितीत डास चावल्याने मलेरिया होऊन मृत्यू झाल्यास त्याला अपघात म्हणता येणार नाही असं न्यायालयाने सांगितले.

मोझंबिक देशाच्या दौऱ्यावर असणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याला डास चावल्याने मलेरिया झाला. याच आजरात त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी विम्याची रक्कम मिळवण्यासाठी अर्ज केला असता कंपनीने नैर्गिक अधिवासामध्ये डास चावल्याने विम्याची रक्कम देण्यास नकार दिला. हे प्रकरण त्यानंतर सर्वोच्च न्यायलयापर्यंत गेले. येथे न्याधिशांनी विमा कंपनीची बाजू योग्य असल्याचा निर्णय देत नैसर्गिक अधिवास असणाऱ्या ठिकाणी किटक चावल्याने झालेला आजार विमा सुरक्षेअंर्गत येत नाही असा निर्णय दिला. मात्र त्याचवेळी अपघात किंवा शारिरीक अडचणींमुळे घडलेल्या घटनांमध्ये किंवा अनपेक्षितपणे जंतूचे संक्रमण झाल्यास विमा कंपनीला विम्याची रक्कम द्यावीच लागेल असंही न्यायालयाने सांगितले.

राष्ट्रीय ग्राहक मंचाने विमा कंपनीविरोधात केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायलायाने हा निर्णय दिला. डास चावल्याने मलेरिया झाल्यास तो अपघात असल्याचे म्हणता येणार नाही असा दावा कंपनीने केला होता. विमा पॉलिसीमधील अटी, कंपनीने केलेला युक्तीवाद यासर्वांच्या आधारे न्यायालयाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला. मोझंबीसारख्या देशामध्ये डास चालवल्याने मलेरिया होऊन एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला अपघात म्हणता येणार नाही असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 3:32 pm

Web Title: death by mosquito not accident cant claim insurance supreme court
Next Stories
1 तुमचं नागपूरचं बंडल तिथेच ठेवा, सुप्रिया सुळेंची टीका
2 रस्त्यावर १० रुपयाची नोट उचलताना त्याने गमावले २ लाख रुपये
3 सरकारचे अपयश सैन्याच्या, वैज्ञानिकांच्या शौर्याआड लपवण्याचा मोदींचा प्रयत्न; ‘मनसे’चा टोला
Just Now!
X