27 May 2020

News Flash

Coronavirus: ब्रिटनमधील प्रसिद्ध भारतीय डॉक्टरचा करोनामुळं मृत्यू

डॉ. राठोड यांनी सन १९७७ मध्ये मुंबई विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले होते.

लंडन : करोना विषाणूच्या संसर्गामुळे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे प्रसिद्ध डॉक्टर जितेंद्र कुमार राठोड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.

करोना विषाणूच्या संसर्गामुळे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे प्रसिद्ध डॉक्टर जितेंद्र कुमार राठोड यांचे सोमवारी सकाळी निधन झाले, ते ६२ वर्षांचे होते. वेल्सच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. राठोड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. डॉ. राठोड यांनी सन १९७७ मध्ये मुंबई विद्यापीठातून वैद्यकीय शिक्षण घेतले होते. त्यानंतर ते ब्रिटनला गेले तिथे त्यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) विभागात काम पाहिले.

कार्डिफ आणि वेल विद्यापीठाच्या आरोग्य विभागाने सांगितले की, “आम्ही मोठ्या दुःखद भावनेने आपल्याला सांगू इच्छितो की, वेल्स विद्यापीठातील कार्डियो-थोरेसिक सर्जरीमध्ये असोसिएट विशेषज्ज्ञ असलेल्या डॉ. जितेंद्र राठोड यांचे निधन झाले आहे.” ब्रिटनमध्ये सध्या करोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असून इथे अनेक भारतीय डॉक्टर्स आणि परिचारिका रुग्णालयांमध्ये हजारो रुग्णांवर उपचार करीत आहेत.

आरोग्य विभागानं पुढं म्हटलं, ‘कोविड-१९ ने पॉझिटिव्ह झाल्यानंतर सोमवारी सकाळी आयसीयूमध्ये त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ते अत्यंत हुशार आणि समर्पित सर्जन होते. त्यांनी आपल्या रुग्णांची खूपच चांगल्या पद्धतीने काळजी घेतली होती. ते सर्वांना प्रिय होते, तसेच सर्वजण त्यांचा सन्मान करायचे.”

ब्रिटनमध्ये करोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या सोमवारी ५,३७३ वर पोहोचली होती. यामध्ये बहुतेक लोक हे भारतीय वंशाचे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 10:02 pm

Web Title: death of a famous indian doctor in britain due to corona virus postive aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनापासून कसं वाचता येईल? वुहानमधल्या भारतीयांनी दिला मोलाचा सल्ला
2 भारत मैत्रीला जागला! शेजारी देशांमध्ये विशेष विमानाने पोहोचवली औषधे
3 देशातील करोनाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर… मास्क, आयसोलेशन बेड, व्हेंटिलेटर्स किती जाणून घ्या
Just Now!
X