News Flash

गुरे चोर समजून जमावाकडून मारहाण; एकाचा मृत्यू

मेढाखारमधील दोन इसम खरेदी केलेल्या चार म्हशी पोहोचविण्यासाठी साल्हेघोरी येथून बुधवारी आले होते.

पॉवर बँकसारखं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस हातातच फुटल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

छत्तीसगडच्या गौरेला-पेंड्रा-मारवाही जिल्ह्यात ग्रामस्थांनी गुरे चोर असल्याच्या संशयावरून केलेल्या बेदम मारहाणीत एका ४५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले.  साल्हेघोरी गावात गुरुवारी घडलेल्या या घटनेसंदर्भात जवळपास सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

मेढाखारमधील दोन इसम खरेदी केलेल्या चार म्हशी पोहोचविण्यासाठी साल्हेघोरी येथून बुधवारी आले होते. स्थानिकांनी त्यांना  गुरे त्यांच्या मालकीची असल्याबाबतची कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. मात्र त्यांच्याजवळ कोणतीच कागदपत्रे नव्हती. ग्रामस्थांनी त्यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांना गावातील एका सभागृहात डांबले. गुरुवारी सकाळी या दोघांचे नातेवाईक आले असता  त्यांनाही  बेदम मारहाण झाली.  त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. एकूण २२ जणांनी बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:19 am

Web Title: death of a man beaten by a mob on the understanding of an animal thief akp 94
Next Stories
1 अलिगढमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू
2 परीक्षेत तिसरा क्रमांक आल्याने टेक्सासमधील विद्यार्थिनीची कोर्टात धाव!
3 भोपाळ : ‘एफसीआय’ लिपीकाच्या घरी ‘सीबीआय’चा छापा; २.१७ कोटींसह ८ किलो सोनं हस्तगत!
Just Now!
X