हिंदीचे प्रतिष्ठित लेखक, कवी आणि निवेदक यांचे बुधवारी दीर्घकालिन आजाराने निधन झाले. दिल्लीतील जी.बी. पंत हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. ब्रेन हॅमरेजचा त्रास असल्याने त्यांना मागील काही दिवसांपासून दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदी अकादमीचे उपाध्यक्षपद त्यांच्याकडे होते. मागील आठवड्यात ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांचा डावा भाग पॅरालाईज झाला होता. ते आपल्या कुटुंबासोबत मुंबईमध्ये राहत होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांची मुलगी प्रीती खरे बॉलीवूड कलाकार असून देवदासमध्ये तिने शाहरुख खानच्या वहीनीची भूमिका केली आहे.

खरे यांचा जन्म ९ फेब्रुवारी रोजी झाली. हिंदीचे शिक्षण घेतलेल्या खरे यांनी याच भाषेत करीयर करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी साहित्यनिर्मिती केली. तसेच समीक्षक, कवी आणि निवेदक म्हणूनही त्यांनी अतिशय कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली. त्यांनी लिहीलेला ‘आलोचना की पहली किताब’ या ग्रंथावर बरीच चर्चा झाली. त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे त्यांना साहित्यिक योगदान पुरस्कार, रघुवीर सहाय्य स्मृती पुरस्कार, भवानी प्रसाद मिश्र स्मृती पुरस्कार आणि मध्य प्रदेश शिखर सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.