News Flash

‘प्रत्येक बाल अत्याचाराच्या घटनेवर मृत्यूदंडाची शिक्षा हे उत्तर नाही’

सरकारने सुप्रीम कोर्टात दिली माहिती

सुप्रीम कोर्ट

प्रत्येक बाल अत्याचाराच्या घटनेवर मृत्यूदंड हे उत्तर नाही, तर यासाठी यातील विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी वर्गीकृत शिक्षेची तरतुद बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यात (पोक्सो) करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात गुरुवारी ही माहिती दिली. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

‘मृत्यूदंड हे प्रत्येक गुन्हेगारी कृत्यावर उत्तर नाही. बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यातही (पोक्सो) यासाठी विविध प्रकारच्या गुन्ह्यांसाठी विविध प्रकारच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पी. एस. नरसिंहा यांनी सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही माहिती दिली. ८ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची सुनावणी या खंडपीठाकडे सुरु आहे. या सुनावणीदरम्यान नरसिंहा यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

या प्रकरणी पीडित चिमुकलीची झालेल्या लैंगिक अत्याचाराची केस लढवणाऱ्या याचिकाकर्त्या वकिलांनी आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी केली आहे. यावर सरकारने पोक्सो कायद्याची माहिती न्यायालयात दिली. तुम्ही मागणी केल्याप्रमाणे या प्रकरणात आम्ही मृत्यूदंडाची शिक्षा सुचवू शकत नाही. यासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी काय आहेत, याची माहिती घेण्यात येत असल्याचे सरन्याायधीशांनी म्हटले आहे.

या प्रकरणाला क्रूर आणि पाशवी गुन्हेगारी कृत्य असे समजत न्यायालयाने पोक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या याचिकांवर विचार करीत असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मार्च रोजी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 1, 2018 4:49 pm

Web Title: death penalty not answer to every child sex abuse govt to sc
Next Stories
1 बजेटच्या दिवशी काँग्रससाठी अच्छे दिन; राजस्थानच्या दोन्ही पोटनिवडणुकीत भाजपला धोबीपछाड
2 दाऊदवरील चित्रपटाचा दिग्दर्शक छोटा शकीलच्या हिटलिस्टवर
3 Budget 2018: जाणून घ्या, काय स्वस्त काय महाग
Just Now!
X