21 September 2020

News Flash

विमान अपघातातील मृतांची संख्या १८

ब्लॅक बॉक्स सापडला, दुर्घटनेची चौकशी सुरू

ब्लॅक बॉक्स सापडला, दुर्घटनेची चौकशी सुरू

कोझिकोड : केरळच्या कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरल्याने अपघातग्रस्त झालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ शनिवारी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेमागील कारणांचा उलगडा होऊ शकेल. या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान. एका जखमी विमान प्रवाशाचा शनिवारी मृत्यू झाल्याने बळींची संख्या १८वर पोहोचली आहे.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने अपघाताच्या कारणांचा शोध सुरू केला आहे. विमानाचा डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर सापडले असून विमान अपघात चौकशी संस्थेने तपास सुरू केला आहे.

आणखी एका जखमी प्रवाशाचा शनिवारी मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. एक मृत प्रवासी करोनाग्रस्त आढळल्याने मदतकार्यात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना स्वविलगीकरणात पाठवण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, तर गंभीर जखमींना २ लाख आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  मदतकार्यासाठी दिल्लीहून दोन, तर मुंबईहून एक विमान दाखल झाले आहे.

कॅप्टन साठे यांचे कुटुंबीय कोझिकोडला

मुंबई : कोझिकोड विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले कॅप्टन दीपक साठे यांच्या पत्नी, मुलगा, बहीण आणि मेहुणे तत्काळ केरळ येथे रवाना झाले. त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यापेक्षा तेथेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 3:52 am

Web Title: death toll rises to 18 in kozhikode plane crash zws 70
Next Stories
1 धावपट्टीचे विस्तारीकरण तातडीने व्हावे
2 .. अन् कॅप्टन साठे आईच्या वाढदिवसाला पोहोचलेच नाहीत
3 ‘मशीद आवारातील भूमिपूजनाचे आदित्यनाथांना निमंत्रण’
Just Now!
X