ज्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, त्या दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी येत्या दहा सप्टेंबर रोजी निकाल देण्यात येणार आहे. एकूण चार आरोपींवर पोलिसांनी हत्येचा आरोप ठेवला आहे. 
बालगुन्हेगारास ३ वर्षांची शिक्षा

गेल्यावर्षी १६ डिसेंबर रोजी दिल्लीत चालत्या बसमध्ये २३ वर्षांच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या त्या तरुणीचा उपचारांदरम्यान सिंगापूरमध्ये मृत्यू झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून याप्रकरणाची सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. या घटनेतील एक आरोपी मुकेश याने घटना घडली त्यावेळी बसमध्ये हजर होतो, याची कबुली न्यायालयापुढे दिली. मात्र, मी केवळ बस चालवत होतो. संबंधित मुलीवर मी कोणताही अत्याचार केलेला नाही, असे त्याने म्हटले आहे. अन्य तीन आरोपी विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. दिल्लीचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. गेल्या शनिवारी या खटल्यातील अल्पवयीन आरोपीला अल्पवयीन न्याय मंडळाने तीन वर्षाची शिक्षा सुनावली.
न्यायदेवतेचा तराजू..