News Flash

डिसेंबरपर्यंत सर्वांना करोनावरील लस मिळणार; भाजपाध्यक्ष जे पी नड्डांचं आश्वासन

'टूल किट'मुळे काँग्रेसचा खरा चेहरा समोर

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुधवारी डिसेंबर पर्यंत प्रत्येक नागरिकाला करोनावरील लस उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे सांगितले. यासोबत नड्डा यांनी काँग्रेसने लोकांमध्ये भीती निर्माण केल्याचा आरोप केला आहे. भाजपाच्या खासदारांशी चर्चा करत नड्डा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

“पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना आणि मुख्यमंत्र्याना मार्च महिन्यातच करोना दुसरी लाट येण्याअगोदरच सर्व तयारी करण्यास सांगितले होते. भारताने फक्त ९ महिन्यातच दोन भारतीय लसी कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन तयार केल्या. आतापर्यंत १८ कोटी पेक्षा जास्त भारतीयांनी त्या घेतल्या आहेत. डिसेंबरच्या शेवटी सर्व देशातल्या नागरिकांना लस देण्यात येईल यासाठी वेळ निश्चित केली जात आहे”, असे नड्डा यांनी सांगितले.

आणखी वाचा- मोठा निर्णय! आता घरातच करु शकता करोना चाचणी; पुण्यातील कंपनीच्या टेस्ट किटला मान्यता

“केंद्रातील मोदी सरकारने ऑक्सिजन आणि रेमडेसीविरची उपलब्धता आणि पुरवठा सुनिश्चित केला आहे. सर्व राज्यांना आवश्यक मदत पाठविली जात आहे. ‘टूल किट’ने काँग्रेसचा खरा चेहरा समोर आणला आहे. करोनाच्या काळातही देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदी अविरतपणे देशातील जनतेची सेवा करीत आहेत आणि काँग्रेस लोकांमध्ये संभ्रम पसरवून भीती निर्माण करत आहे,” असे नड्डा म्हणाले.

आणखी वाचा- करोनाची दुसरी लाट जुलैमध्ये संपणार; सहा महिन्यांनी येणार तिसरी लाट

भाजपातर्फे देशभरात गरजूंच्या मदतीसाठी सेवा ही संगठन-२  द्वारे काम करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते देशभरात क्वारंटाइन आहेत आणि भाजपा सेवा ही संघठनच्या माध्यमातून देशात आणि राज्यात चांगलं काम करत असल्याचे नड्डा म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 9:46 am

Web Title: december everyone will be vaccinated against corona assurance of bjp president jp nadda abn 97
Next Stories
1 करोनाची दुसरी लाट जुलैमध्ये संपणार; सहा महिन्यांनी येणार तिसरी लाट
2 पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर ब्रेक! जाणून घ्या दर…
3 मोठा निर्णय! आता घरातच करु शकता करोना चाचणी; पुण्यातील कंपनीच्या टेस्ट किटला मान्यता
Just Now!
X