News Flash

लख्वीबाबत पाच दिवसांत निर्णय घेण्याचा आदेश

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकीउर रहमान लख्वी याच्या स्थानबद्धता प्रकरणाबाबत पाच दिवसात निर्णय घ्यावा, असा आदेश लाहोर उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला दिला आहे.

| March 27, 2015 01:28 am

लख्वीबाबत पाच दिवसांत निर्णय घेण्याचा आदेश

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार झकीउर रहमान लख्वी याच्या स्थानबद्धता प्रकरणाबाबत पाच दिवसात निर्णय घ्यावा, असा आदेश लाहोर उच्च न्यायालयाने पंजाब सरकारला दिला आहे. दरम्यान, लख्वीला मंजूर करण्यात आलेला जामीन रद्द करावा यासाठी सरकारने केलेल्या अर्जावर ‘न्यायाधीश सुटीवर असल्यामुळे’ गुरुवारी सुनावणी होऊ शकली नाही.
लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन कमांडर असलेल्या लख्वीला इस्लामाबादच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने गेल्या वर्षी १८ डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. मात्र याबाबत भारताने तीव्र निषेध नोंदवल्यानंतर पाक सरकारने त्याला दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक सुव्यवस्था कायद्याखाली अटक केली होती. लख्वी रावळपिंडी न्यायालयातून सुटका होण्याच्या बेतात असतानाच २००९ साली एका अफगाणी नागरिकाचे अपहरण केल्याच्या आरोपात त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी त्याला जामीन मिळाला आहे. लख्वीची स्थानबद्धता दुबळ्या आधारावर करण्यात आल्याचे सांगून इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या स्थानबद्धतेला स्थगिती दिली. सरकारने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर या आदेशाला स्थगिती देण्यात आली.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या स्थानबद्धतेच्या प्रकरणावर सुनावणी करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी न्यायालयीन अवमान याचिका लख्वीने लाहोर उच्च न्यायालयात केली. त्यावर, या प्रकरणी पाच दिवसात निर्णय घ्यावा, असा आदेश न्या. महमूद बाजवा यांनी पंजाब सरकारच्या गृहमंत्रालयाला दिला.
दरम्यान, लख्वीला मिळालेला जामीन रद्द करावा या पाकिस्तान सरकारने केलेल्या अर्जावरील सुनावणी गुरुवारी न्यायाधीश सुटीवर असल्यामुळे होऊ शकली नाही, असे अभियोजन पक्षाचे प्रमुख चौधरी अझहर यांनी सांगितले. १७ मार्चला लख्वीचे वकील हजर नसल्यामुळे सुनावणी झाली नव्हती. सुनावणीची तारीख न्यायालय नंतर निश्चित करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2015 1:28 am

Web Title: decide lakhvi detention in five days
टॅग : Lakhvi
Next Stories
1 जाहीररीत्या चुंबन घेण्यास गोव्यात बंदी
2 जाट आरक्षणाच्या मुद्दय़ावर कायद्याच्या चौकटीतच तोडगा
3 पाकिस्तानशी सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्याचा चीनचा संकल्प
Just Now!
X