Sperm-donor-2ब्रिटनचा ‘विक्की डोनर’ डेकलेन रूनी सध्या चांगलाच चर्चेत आहे. आपण ५४ मुलांचा पिता असल्याचा दावा ४३ वर्षीय रूनीने केला आहे. या मुलांमध्ये १७ मुलगे आणि १४ मुलींचा समावेश असून, त्याने केलेल्या वीर्यदानाने अजून १५ स्त्रिया गर्भवती आहेत. स्पर्म डोनेट करण्याच्या उद्देशाने मागील वर्षी एका संकेतस्थळाची निर्मिती केल्यानंतर त्याने ३१ लोकांना स्पर्म डोनेट केले. आपली लोकप्रियता वाढत असून, एकदा २४ तासात तीन स्त्रियांना स्पर्म डोनेट केल्याचे तो सांगतो. आपल्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांमध्ये समलिंगी अथवा एकटेपणाचे जीवन जगणाऱ्या स्त्रियांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती तो देतो. रूनीद्वारे तयार करण्यात आलेले स्पर्म डोनेशनचे संकेतस्थळ लोकप्रिय होत असताना त्याच्या विरोधातदेखील सूर उठत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करत अशाप्रकारची अनधिकृत सेवा धोकादायक ठरू शकत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. स्पर्म डोनेट करणाऱ्यांना अश्लिल समजले जात असल्याची खंत व्यक्त करत रूनीनेदेखील आपली बाजू मांडली आहे. मी काही वाईट करत नसून, या कामाची मला लाज वाटत नसल्याचे तो म्हणतो. स्त्रियांना त्यांच कुटुंब पूर्णत्वास नेण्यास आपण मदत करत असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. चार स्त्रियांपासूनची रूनीची स्वत:ची आठ अपत्ये आहेत. आपल्या या कार्याचा प्रचार करण्यासाठी रूनीने फेसबुकचीदेखील मदत घेतली आहे. समलिंगी, बायसेक्स्युअल आणि एकटया राहणाऱ्या स्त्रिया ज्या स्वत:च्या अपत्याला जन्म देऊ शकत नाहीत, अशा स्त्रियांसाठी स्पर्म डोनेशनची ही सेवा उपलब्ध असल्याची नोंद त्याने आपल्या संकेतस्थळावर केली आहे. या कार्याचा मोबदला घेत नसल्याचा दावादेखील त्याने केला आहे. ज्या स्त्रियांना स्पर्मची गरज असते त्यांच्याकडून रूनी केवळ येण्या-जाण्याचा खर्चाचे पैसे घेतो.

sperm-donor-5

sperm-donor-4

rooney-4.jpg