आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दीपक कोचर यांची रवानगी १९ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीत करण्यात आली आहे. आयसीआयसीआयच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सोमवारी ईडीने अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली आहे. विशेष PMLA कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने सोमवारी अटक केली. आयसीआसीआय बँक व्हिडीओकॉन केस प्रकरणात ही कारवाई ईडीने केली. आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप त्यांच्यावर आहे.

काय आहे प्रकरण?
चंदा कोचर यांच्यावर त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केलाया आरोप आहे. आयसीआयसीआय ने व्हिडीओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं.

व्हिडीओकॉन ग्रुपने कर्जाच्या ८६ टक्के रक्कम चुकवली नव्हती. २०१७ मध्ये हे कर्ज NPA मध्ये टाकण्यात आलं

व्हिडीओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी २०१० मध्ये न्यू पॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेडला ६४ कोटी रुपये दिले होते.

दरम्यान या प्रकरणी आज दीपक कोचर यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी ईडी कोठडीत केली आहे १९ सप्टेंबरपर्यंत दीपक कोचर यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष PMLA कोर्टाने हा निर्णय दिला आहे.