News Flash

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल अडचणीत, ‘ईडी’ने बजावले समन्स

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे.

संग्रहित छायाचित्र

हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. ईडीने प्रफुल्ल पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून हवाई वाहतूक उद्योगातील ‘लॉबिस्ट’ दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले, असा दावा ‘ईडी’ने न्यायालयात केला होता. दीपक तलवार हा माजी नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता, असे देखील ‘ईडी’ने न्यायालयात म्हटले होते.

दीपक तलवारच्या अटकेनंतर प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी होणार, अशी शक्यता होती. अखेर शनिवारी ईडीच्या वकिलांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना ईडीने प्रफुल्ल पटेल यांना समन्स बजावल्याची माहिती दिली. ईडीने पटेल यांना ६ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.

काय आहे प्रकरण ?
आर्थिक स्थिती नसताना ७०,००० कोटी रुपये किमतीच्या १११ विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, परकीय गुंतवणूकीतून प्रशिक्षण संस्था सुरु करणे तसेच आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणे अशा चार प्रकरणांचा ईडीकडून तपास सुरु आहे. या चारही प्रकरणांमध्ये गैरव्यवहार हे सर्व प्रकरण यूपीए- १ च्या काळातील असून त्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे विमान वाहतूकमंत्रीपदाचा कार्यभार होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 3:38 pm

Web Title: deepak talwar aviation deals case ed summons ncp leader praful patel on june 6
Next Stories
1 ऑगस्टा वेस्टलँड : सुशेन गुप्ताला सशर्त जामीन
2 ३०० जागा जिंकलात म्हणून मनमानी करु शकत नाही; ओवेसी मोदींवर बरसले
3 सिलिंडर महाग, अनुदानित आणि विनाअनुदानित दोन्हीचे दर वाढले
Just Now!
X