06 April 2020

News Flash

मनोहर पर्रिकर निवृत्तीच्या तयारीत?

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर.

संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. वयाच्या साठीनंतर लोकांनी आपल्या निवृत्तीचा विचार करायला हवा. मी येत्या १३ डिसेंबरला साठ वर्षांचा होतोय. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच यासंदर्भात विचार करणं सुरू केलं होतं, असे मनोहर पर्रिकर गोव्यातील मापुसा शहरात रविवारी लोकमान्य को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या कार्यक्रमात म्हणाले. मोठी जबाबदारी स्विकारण्यात माझ्या मनात सध्या तरी विचार किंवा रस नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

गोव्यासारख्या छोट्या राज्यांतून चांगल्या गुणवत्तेचे नेते कमी तयार होतात याची कबुली देत राजकारण सोडल्यानंतरही गोव्यावर लक्ष देणार असल्याचे मनोहर पर्रिकर यांनी सांगितले. छोट्या राज्यांतून दर्जेदार नेते तयार होण्याची शक्यता कमी असते ही वस्तुस्थिती आहे. पण, राज्य चुकीच्या मार्गावर जात असेल तर योग्य मार्ग दाखवण्याची माझी जबाबदारी आहे आणि ती मी वेळोवेळी पार पाडेन, असेही पर्रिकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2015 8:52 am

Web Title: defence minister manohar parrikar hints at retiring from politics
टॅग Politics
Next Stories
1 पाकसाठी हेरगिरी करणारे ५ अटकेत
2 अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी
3 देवदासी प्रथा रोखण्यात केंद्राला अपयश
Just Now!
X