02 March 2021

News Flash

राहुल गांधींना शायराना अंदाजात उत्तर देण्याच्या प्रयत्नात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून झाली चूक

"दर्द हो दिल में तो दवा कीजे, और जो दिल ही न हो तो क्या कीजे,"

काँग्रेसचे नेते राहुल गांधी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह. (संग्रहित छायाचित्र)

भारत-चीन यांच्यातील सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शायराना अंदाजात मोदी सरकारवर टीका केली होती. अमित शाह यांनी केलेल्या विधानाला उत्तर देताना शेर ट्विट करून सरकारला टोला लगावला होता. राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही शायरीतून उत्तर दिलं होतं. पण, हे उत्तर देण्याच्या नादात सिंह यांच्याकडून चूक झाली.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल रॅलीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताच्या सीमा संरक्षणाच्या सामर्थ्याबद्दल भाष्य केलं होतं. “भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे” असं शाह म्हणाले होते.

शाह यांच्या विधानावर राहुल गांधी यांनी मिर्झा गालिब यांच्या “हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन, दिल के ख़ुश रखने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है,” या शेरचं विडंबन करत टीका केली होती. “सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन, दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है।,” असं म्हणत राहुल यांनी केंद्रावर शायराना अंदाजात निशाणा साधला होता.

राहुल गांधी यांनी शायरीतून टीका केल्यानं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही त्याच भाषेत राहुल गांधींना उत्तर दिलं. “‘हाथ’ में दर्द हो तो दवा कीजै, ‘हाथ’ ही जब दर्द हो तो क्या कीजै,” असं विडंबनात्मक शायरीतून राहुल यांना टोला लगावला होता. मात्र, हा शेर ट्विट करताना राजनाथ सिंह यांच्याकडून चूक झाली. हा शेर मिर्झा गालिब यांचा असल्याचा दावा राजनाथ यांनी केला होता. मात्र, मुळात शेर मंजर लखनवी यांचा आहे. “दर्द हो दिल में तो दवा कीजे, और जो दिल ही न हो तो क्या कीजे,” असा हा मंजर लखनवी यांचा मूळ शेर आहे.

मंजर लखनवी यांची शायरी (सौजन्य : रेख्ता )

दर्द हो दिल में तो दवा कीजे

और जो दिल ही न हो तो क्या कीजे

ग़म में कुछ ग़म का मशग़ला कीजे

दर्द की दर्द से दवा कीजे

आप और अहद-ए-पुर-वफ़ा कीजे

तौबा तौबा ख़ुदा ख़ुदा कीजे

देखता हूँ जो हश्र के आसार

अपने तेवर मुलाहिज़ा कीजे

नज़र-ए-इल्तिफ़ात बन गई मौत

मिरी क़िस्मत को आप क्या कीजे

देखिए मुक़तज़ा-ए-हाल-ए-मरीज़

अब दवा छोड़िए दवा कीजे

चार दिन की हयात में ‘मंज़र’

क्यूँ किसी से भी दिल बुरा कीजे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 1:40 pm

Web Title: defence minister rajnath singh makes mistake in his shayari bmh 90
Next Stories
1 आमच्या वस्तूंशिवाय भारतीय राहूच शकतच नाही म्हणणाऱ्या चीनला सोनम वांगचुक यांचे उत्तर; म्हणाले…
2 गोव्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी करोना चाचणीच्या नियमांत बदल, नवी नियमावली जाहीर
3 सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथ सिंग यांचे हे ‘अनुभवाचे बोल’ : नवाब मलिक
Just Now!
X