पाकिस्तान आणि चीन यांच्या सीमेलगतच्या काही भागांत असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन भारतीय लष्कराने शस्त्रे खरेदी प्रक्रिया सुरू केली आहे.  ७३००० असॉल्ट रायफल भारत अमेरिकेकडून लवकरच खरेदी करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या प्रस्तावाला अखेर संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

७३००० असॉल्ट रायफलसाठी भारताला ७०० कोटी रूपये मोजावे लागणार आहेत. खरेदी करार झाल्याच्या तारखेपासून वर्षभरामध्ये ही रायफल्स अमेरीकन कंपनीला भारताला द्यावी लागतील अशी माहिती सूत्रांनी दिली. चीन सीमेवर तैनात असलेल्या जवानांना या रायफली देण्यात येणार आहेत.

मागील वर्षी संरक्षण मंत्रालयाने असॉल्ट रायफल खरेदी आणि कार्बाइन खरेदीसाठी ‘रिक्वेस्ट फॉर प्रपोजल्स’ मागवले होते. भारत खरेदी असलेली असॉल्ट रायफलचा वापर अमेरिकेसह काही युरोपीयन देशांची लष्कर वापर करत आहेत.