17 January 2019

News Flash

संरक्षण मंत्रालयाची ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी

तिन्ही सैन्यदलांसाठी शस्त्रखरेदी

निर्मला सीतारामन

संरक्षण मंत्रालयाने ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. लष्कर, नौदल आणि वायुसेना यातील सैनिकांसाठी या रायफल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या संदर्भातल्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या रायफल्सची किंमत १२,२८० कोटी इतकी असल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संरक्षण विभागाची एक बैठक संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १,८१९ कोटींच्या लाईट मशीन गन्सही विकत घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत स्नाईपर रायफल्सबाबतही चर्चा झाली. ५७१९ स्नाईपर रायफल्सच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या स्नाईपर रायफल्सची किंमत ९८२ कोटी रुपये असल्याचीही माहिती समोर आली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

First Published on February 13, 2018 7:24 pm

Web Title: defense ministry cleared a proposal to buy 7 40 lakh assault rifles