News Flash

राज्यमंत्री भामरे यांचे अधिकार कायमच!

‘भामरे यांच्याकडे संरक्षण मंत्रालयातील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत

संरक्षण मंत्रालयाचा अधिकृत खुलासा

संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे कोणतेही अधिकार कमी करण्यात आले नसल्याचा स्पष्ट खुलासा संरक्षण मंत्रालयाने बुधवारी अधिकृतपणे केला. भामरे हे अत्यंत सक्षमपणे आणि निष्ठेने जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे.

११ ऑगस्ट रोजी काढलेल्या एका आदेशान्वये, भामरे यांच्याकडील अनेक महत्वाची धोरणात्मक कामे काढून घेतल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. त्याचा स्पष्ट इन्कार संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे केला आहे.

‘भामरे यांच्याकडे संरक्षण मंत्रालयातील अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत आणि ते सक्षमपणे पार पाडीत आहेत. उच्चविद्यविभूषित असलेले डॉ. भामरे हे त्यांना दिलेले काम निष्ठेने पार पाडीत आहेत. संरक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री मनोहर र्पीकर यांच्याबरोबर त्यांचे उत्तम संबंध आहेत,’ असे स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक नितीन वाकणकर यांनी अधिकृतरीत्या प्रसिद्ध केले आहे.

दरम्यान, भामरे यांच्यासंदर्भात वीस ऑगस्टरोजी प्रकाशित झालेल्या वृत्तावर ‘लोकसत्ता’ ठाम आहे. १८ जुलै व ११ ऑगस्ट रोजी संरक्षण मंत्रालयाने काढलेल्या आदेशातील तफावतीवर आधारित हे वृत्त आहे.

तीनही संरक्षण दलांसह तटरक्षक दलाचे कार्यान्वयन (ऑपरेशनल मॅटर्स), व्यूहतंत्रात्मक यंत्रणा (म्हणजे अण्वस्र, क्षेपणास्र), संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसंदर्भातील (डीआरडीओ) सर्व बाबी आदी कामे भामरे यांच्याकडे नसतील, असा स्पष्ट उल्लेख आदेशामध्ये आहे. या आदेशाची प्रत संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटवरही प्रकाशित करण्यात आली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2016 12:10 am

Web Title: defense ministry official clarification about subhash bhamre
Next Stories
1 काबूलमधील अमेरिकन विद्यापीठात हल्ला, २ ठार तर ५ जखमी
2 बलुचिस्तानात मोदींचे वारे, पाक विरोधात फडकला तिरंगा
3 हरियाणाचे मुख्यमंत्री सिंधूचे नावाचं नव्हे, तर प्रांतही विसरले….
Just Now!
X