News Flash

रात्री मित्रासोबत फिरणाऱ्या तरुणीवर बलात्कार; मद्यपीविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी नराधमाचा शोध सुरु केला आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र )

दिल्ली आणि सभोवतालच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिल्लीतील गाझीपूर येथे रात्री मित्रासोबत बाहेर फिरणाऱ्या तरुणीवर ४० वर्षांच्या नराधमाने बलात्कार केला. पोलिसांनी नराधमाचा शोध सुरु केला आहे.

गाझीपूरमध्ये १९ वर्षांची तरुणी तिच्या मित्रासोबत बाहेर गेली होती. रात्री आठच्या सुमारास दोघेही पेपर मार्केट परिसरातून जात होते. यादरम्यान, मद्यधूंद अवस्थेतील एक माणूस त्यांच्याजवळ आला. एवढ्या रात्री मुलासोबत बाहेर का फिरतेस असा जाब त्याने तरुणीला विचारला. या प्रकारामुळे पीडित तरुणी आणि तिचा मित्र घाबरुन घरी जाण्यासाठी निघाले. मात्र त्या मद्यपीने दोघांचा पाठलाग सुरु केला. तरुणीचा मित्र निघून गेल्यावर नराधमाने निर्जनस्थळी तरुणीला गाठले. तिला रस्त्यालगतच्या झाडाझुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. रात्री मित्रासोबत फिरते म्हणून त्याने पीडितेला बेदम मारहाणदेखील केली.

पीडितेने प्रतिकार करत स्वतःची सुटका करुन घेतली आणि तिथून पळ काढून घर गाठले. घरी परतल्यावर तिने आईला घडलेला प्रकार सांगितला आणि दुसऱ्या दिवशी दोघींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 12:15 pm

Web Title: delhi 19 year old girl raped by drunk man beats her for roaming late at night with male friend
Next Stories
1 अमेरिकेवर आर्थिक संकट, सरकार ‘शटडाऊन’
2 Bigg Boss 11: शिल्पा शिंदेने ‘बिग बॉस’च्या अंतिम सोहळ्यात रचला इतिहास
3 अणुकरारातील बदलास इराणचा नकार
Just Now!
X