News Flash

दिल्लीत आगीचं तांडव, ४३ जणांचा मृत्यू

मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीमध्ये एका फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीत होरपळून ४३ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली आहे. या भीषण आगीमधून शेकडो लोकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीत अनेकजण जखमी झाले असून त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील राणी झांशी रोडजवळील अनाज मंडीतील एका फॅक्ट्रीला सकाळी अचानक भीषण आग लगाली. या आगीत आतापर्यंत ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण आगीत गंभीर भाजलेल्यांना सफदरजंग आणि एलएनजेपी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या भीषण आगीमधून अनेकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळावर होते. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे अग्निशमन दलाच्या आधिकाऱ्यानं सांगितले आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, फॅक्ट्रीमध्ये सकाळी कामगार गाढ झोपले असताना अचानक आगीचा तांडव झाला. अनेकांचा आगीच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घेटनेत मृत्यू झालेले कामगार बिहार आणि उत्तरप्रदेशमधील आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत या दुर्घेटनेबाबत दुख: व्यक्त केले आहे.  ही खुपच दुख:द घटना घडली, मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचे केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 9:53 am

Web Title: delhi 35 dead in a fire on rani jhansi road nck 90
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 कांद्याची महागाई कोर्टात, केंद्रीय मंत्र्याविरोधात तक्रार दाखल
3 काश्मीरमध्ये इंटरनेटअभावी ‘नीट’चे अर्ज भरण्यात अडचणी
Just Now!
X