दिल्लीतील खासगी शाळेत शिकणाऱ्या ९ वर्षांच्या मुलाचा त्याच्याच शाळेतील तीन मुलांनी लैंगिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेतले असून शाळेतील शिक्षकांनीही या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे.
शहादरा येथील शाळेत शिकणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलाचा त्याच्याच शाळेत शिकणाऱ्या तीन मुलांनी लैंगिक छळ केला. तिन्ही वेळेला शाळेच्या बसमध्येच हा प्रकार घडला. जुलै महिन्यांच्या शेवटी पहिल्यांदा हा प्रकार घडला होता. त्यावेळी मुलाने याबाबत शाळेतील शिक्षिकेकडे तक्रार केली होती. मात्र, त्या शिक्षिकिने मुलाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी या प्रकरणात शिक्षिकेलाही समन्स बजावले आहे.
तिन्ही आरोपी हे अल्पवयीन असून त्यांच्यावर पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ जुलै, ३० जुलै आणि १ ऑगस्ट रोजी त्या मुलाचा लैंगिक छळ करण्यात आला. शेवटी मुलाने आईला हा प्रकार सांगितला आणि आईने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 4:56 am