दिल्लीत पुन्हा एकदा एक धक्कादायक व महिलांचा सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली आहे. चालत्या बसमध्ये एका २५ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत छेडछाडीची घटना घडली. एवढंच नाहीतर संबंधित आरोपीने विरोध करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलवर प्राणघातक करून तिला गंभीर जखमी देखील केल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला पोलीस कॉन्स्टेबलची जिल्ह्याच्या पीसीआरमध्ये नियुक्ती करण्यात आली असुन, त्या कामावर जात असताना ही घटना घडली.

तक्रारीनुसार, पीडित महिला कॉन्स्टेबल क्लस्टर बसद्वारे जात होत्या. त्यांच्या मागोमाग त्या बसमध्ये एक आरोपी देखील चढला व त्यांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला. त्यानंतर त्याने त्या महिला कॉन्स्टेबलची छेड काढण्यास सुरूवात केली. त्यानंतर महिलेकडून यास विरोध करण्यात आल्याने त्याने हेल्मेटने मारहाण सुरू केली. यावेळी बसमध्ये काही महिला व पुरुषांची देखील उपस्थिती होती, परंतु कोणीही मदतीसाठी समोर आले नाही. हे कृत्य केल्यानंतर आरोपी दुसऱ्याबसमध्ये चढून फरार देखील झाला. यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील महिलेस उपचारासाठी दीनदयाल उपाध्याय रूग्णालयात नेण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलीस उपायुक्त संतोष कुमार मीणा यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi a female police constable was beaten in a moving bus msr
First published on: 06-03-2021 at 21:01 IST