27 November 2020

News Flash

दिल्लीत स्थानिक टोळक्याच्या मारहाणीत परदेशी युवकाचा मृत्यू

वाद झाल्यानंतर या टोळक्याने त्याला रस्त्याने पळवून पळवून मारहाण केली.

| May 21, 2016 12:07 pm

Vasant Kunj : एम.टी. ओलिव्हिया हा आफ्रिका खंडातील किंगडम ऑफ कोंगो या देशाचा नागरिक आहे.

दिल्लीच्या वसंतकुंज परिसरात एका २३ वर्षीय आफ्रिकन युवकाची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एम.टी. ओलिव्हिया या भागात कामासाठी आला असताना त्याचा येथील तीन-चार युवकांशी वाद झाला. एम.टी. ओलिव्हिया हा आफ्रिका खंडातील किंगडम ऑफ कोंगो या देशाचा नागरिक आहे. वाद झाल्यानंतर या टोळक्याने त्याला रस्त्याने पळवून पळवून मारहाण केली. त्यानंतर त्याला दगडाने ठेचण्यात आले. जखमी अवस्थेत असलेल्या ऑलिवला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2016 12:07 pm

Web Title: delhi african youth beaten to death in vasant kunj one suspect detained
Next Stories
1 बाबरी आणि गुजरात दंगलीचा सूड घेऊ; ‘आयसिस’च्या व्हिडिओत ठाण्यातून पळून गेलेल्या तरूणाची धमकी
2 आता मागणीनुसार वीजजोडणी – गोयल
3 विजयन केरळचे नवे मुख्यमंत्री
Just Now!
X