24 October 2020

News Flash

धक्कादायक! : उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून बलात्कार

धक्कादायक! : उपचार घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडून बलात्कार

प्रतीकात्मक छायाचित्र

दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधीत कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

https://twitter.com/ANI/status/1043063568835461120
पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या रोहिणी भागातील ईएसआय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या रुग्णालयात एका ११ वर्षीय मुलीला उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, रुग्णालयात साफ सफाईचे काम करणाऱ्या एका व्यक्तीने या मुलीवर बलात्कार केला.

यासारखा आणखी एक प्रकार गुरुवारी दिल्लीत घडला असून एका महिलेवर बलात्कार आणि तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलिसावर अटकेची कारवाई करण्यात आली. एसीपी रमेश दहिया असे या आरोपी पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या अधिकाऱ्यावर बालात्काराचे आरोप झाल्यानंतर त्याला तातडीने बडतर्फ करण्यात आले. तर या पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावरील आरोप खोडून काढताना आपण या महिलेला मदतीसाठी पैसे दिले होते. तिला मी पैसे परत मागिल्याने तिने चिडून माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला आहे.

दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील एका महिलेने आपल्या ७ वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही मुलगी घराच्या अंगणात खेळत असताना हा प्रकार घडला होता पीडित मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर तो उघड झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 3:44 pm

Web Title: delhi an 11 year old girl has been allegedly raped in esi hospital rohini by a housekeeping staff of the hospital case registered at kn katju marg police station
Next Stories
1 फुटबॉल सामना पाहिल्याने तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात, इराणी तरुणीचा फोटो व्हायरल
2 हुसेनी ब्राह्मण का पाळतात मोहरम? अभिनेता संजय दत्तपर्यंतची रंजक परंपरा
3 ३१ डिसेंबरच्या आत डेबिट आणि क्रेडिट कार्ड अपग्रेड करा, नाहीतर…
Just Now!
X