News Flash

काँग्रेसची दिल्ली, तेलंगण प्रदेश समिती बरखास्त

शीला दीक्षित यांनी केली २८० ब्लॉकची बरखास्ती

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिल्लीतील नेत्यांबरोबर बैठक केली, ज्यानंतर तत्काळ प्रभावाने दिल्ली प्रदेश काँग्रेस समिती व तेलंगण समिती बरखास्त करण्यात आली. दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित यांनी सर्व २८० ब्लॉकची बरखास्ती केली आहे. तसेच दिल्ली व तेलंगण काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षांनी देखील पदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसने केवळ दिल्लीच नाहीतर तेलंगण प्रदेश समिती देखील बरखास्त केली आहे. याबरोबरच पक्षाच्या अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. ज्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव विरेंद्र राठौर, अनिल चौधरी, राजेश धर्मानी आणि परराष्ट्र सेलचे सचिव विरेंद्र वशिष्ठ यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 6:20 pm

Web Title: delhi and telangana pradesh congress committee dissolves msr87
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवला
2 मोदींची कूटनीती, भारतीयांच्या हज कोट्यात तब्बल ३० हजारांची वाढ
3 कारखान्यावर छापा मारायला गेले अन् पोहचले कोठडीत
Just Now!
X