News Flash

दिल्लीत म्हशींची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तरुणांना मारहाण

प्राणी मित्र संघटनेची पोलिसांत तक्रार

दिल्लीत म्हशींची बेकायदा वाहतूक करणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली आहे.

म्हशींची ट्रकमधून वाहतूक करणाऱ्या तिघांना एका प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दक्षिण दिल्लीत घडली आहे. रिझवान, कामिल, आशू अशी मारहाण झालेल्या तिघांची नावे आहेत. मारहाणीत जखमी झाल्याने त्यांना एम्समधील ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परस्परांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दूरध्वनीवरून या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तीन तरुणांना मारहाण केल्याचे पाहिले. मारहाणीत तिघेही जखमी झाले होते. त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तसेच म्हशींसह ट्रक ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पीपल्स फॉर अॅनिमल (पीएफए) या एनजीओतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या एनजीओचे काही कार्यकर्तेही घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला आहे, असे पोलिसांनी सांगितले. एनजीओच्या माहितीनुसार, ट्रकमधून जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. ट्रकमध्ये म्हशींना कोंबले होते. काही म्हशींचा मृत्यूही झाला होता. म्हशींची अवस्था पाहून स्थानिक भडकले. त्यांनी ट्रकचालकासह तिघांना बेदम मारहाण केली. दुसरीकडे तिघांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर एनजीओनेही या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दिल्ली-एनसीआर या परिसरात दररोज हजारो जनावरांनी बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते. शनिवारी सकाळी दक्षिण दिल्ली परिसरात पोलिसांनी अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारे नऊ ट्रक पकडले आहेत, अशी माहितीही एनजीओने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 12:53 pm

Web Title: delhi animal welfare activists allegedly beaten three men transporting buffaloes
Next Stories
1 योगींचा व्हीआयपी संस्कृतीला लगाम, आझम खान, शिवपाल यादव यांच्या सुरक्षेत कपात
2 सीबीआयवर टीकास्त्र सोडणाऱ्या विनय कटियार यांना भाजपने झापले
3 इंडियाला ‘हिंडिया’ बनवू नका, द्रमुक नेते स्टॅलिन यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
Just Now!
X