News Flash

अरविंद केजरीवाल यांना कोण देणार टक्कर?

केजरीवालांविरोधातील लढाई भाजपा आणि काँग्रेससाठी सोपी नाही.

(संग्रहित छायाचित्र)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा या तीन मुख्य पक्षांमध्ये लढत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. केजरीवालांविरोधातील लढाई भाजपा आणि काँग्रेससाठी सोपी नाही. भाजपाने केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून सुनील यादव यांना उमेदवारी दिली आहे. केजरीवाल यांच्याविरोधात उमेदवार बदलण्याचे वृत्त भाजपाने फेटाळून लावले आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सुनील यादवच निवडणूक लढवतील. तेच आमचे उमेदवार आहेत असे दिल्ली भाजपाचे प्रभारी श्याम जाजू यांनी सांगितले. केजरीवाल यांच्याविरोधात सुनील यादव विजयी होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे असे जाजू म्हणाले. याआधी एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने नवी दिल्लीच्या जागेसाठी भाजपा नव्या उमेदवाराच्या नावावर विचार करत असल्याचे वृत्त दिले होते.

सुनील यादव यांच्याजागी भाजपाकडून नव्या उमेदवाराच्या नावावर विचार सुरु असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले होते. पण आता केजरीवाल यांच्याविरोधात सुनील यादवच भाजपाचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने रोमेश सभरवाल यांना उमेदवारी दिली आहे. ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी भाजपाने सर्व उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

कोण आहेत सुनील यादव?
सुनील यादव भाजपाची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चा दिल्ली प्रदेशचे अध्यक्ष आहेत. ते पेशाने वकील आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीसपदही त्यांनी भूषवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 1:20 pm

Web Title: delhi assembly election 2020 bjp sunil yadav contest against aap arvind kejriwal dmp 82
Next Stories
1 …अन् लग्न लागण्याआधीच नवऱ्याचा बाप आणि नवरीची आई पळून गेले
2 हा तर कहरच! १०० पैकी १०० आणि ९९.९३ टक्के मिळूनही जुळे भाऊ पुन्हा देणार JEE ची परिक्षा
3 ‘उबर इट्स’ भारतात बंद होणार; ‘झोमॅटो’नं विकत घेतला व्यवसाय
Just Now!
X