27 February 2021

News Flash

Delhi Assembly Election 2020: बारा वाजेपर्यंत दिल्लीत १५.४७ टक्के मतदान

दिल्लीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा असा तिंरगी सामना आहे.

जोरदार प्रचारानंतर आज अखेर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण ७० जागा असून, ६७२ उमेदवार रिंगणात आहेत. दिल्लीतील एक कोटी पेक्षा जास्त नोंदणीकृत मतदार असून, ते आज आपला मतदानाचा हक्क बजावतील.

दिल्लीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा असा तिरंगी सामना आहे. प्रचारामध्ये आप आणि भाजपा आघाडीवर होते. भाजपाच्या मंत्र्यांपासून सर्वांनीच शाहीन बागचा मुद्दा प्रचारात उचलून धरला, तर आपला मागच्या पाच वर्षात दिल्लीत केलेल्या विकासकामांच्या आधारावर पुन्हा निवडून येण्याचा विश्वास आहे.

२०१५ मध्ये दिल्लीत ७० पैकी ६७ जागांवर आपचे उमेदवार निवडून आले होते. भाजपाला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. आता सुद्धा २०१५ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा आपचा प्रयत्न आहे.

दिल्लीमध्ये ८१ लाख पाच हजार २३६ पुरुष तर, ६६ लाख ८० हजार २७७ महिला मतदार आहेत. संपूर्ण दिल्लीमध्ये एकूण १३,५७१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, १२ वाजेपर्यंत१५.४७ टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2020 8:15 am

Web Title: delhi assembly election 2020 for 70 seats voting today fight between aap bjp congress dmp 82
Next Stories
1 ‘काठी’वरून लोकसभेत धक्काबुक्की
2 उद्योगपती अनिल अंबानी आता धनाढ्य नाहीत!
3 बोडो कराराने आसाममध्ये शांततेची पहाट – मोदी
Just Now!
X