News Flash

मुख्यमंत्री केजरीवाल, उपमुख्यमंत्री सिसोदिया विरोधात मानहानीचा खटला

भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी सात दिवस अगोदर पाठवली होती कायदेशीर नोटीस

संग्रहीत

भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात मानहीनीचा खटला दाखल केला आहे. गुप्ता यांच्यावर आम आदमी पार्टी प्रमुख केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचणा-यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर विजेंद्र गुप्ता यांनी आपली प्रतिमा मलीन करण्याचे हे षडयंत्र आहे, असे सांगत या दोघांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. न्यायालय ६ जून रोजी याप्रकरणी सुनावणी करणार आहे.

विजेंद्र गुप्ता यांनी मुख्यमंत्री केजरीवाल व सिसोदिया यांना एक आठवडा अगोदर कायदेशीर नोटीस पाठवत याप्रकरणी माफी मागावी,असे म्हटले होते. मात्र याचे काहीच उत्तर न आल्याने आता आपण या दोघांविरोधात पटियाला हाउस न्यायालयात खटला दाखल केला असल्याचे गुप्ता यांनी सांगितले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांविरोधात पोलीसात तक्रारही दाखल केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 4:27 pm

Web Title: delhi bjp leader gupta filed defamation case against cm kejriwal and manish sisodia
Next Stories
1 काश्मीरात सुरक्षा रक्षकांची नवी हिटलिस्ट; १० खतरनाक दहशतवादी निशाण्यावर
2 डिलिमिटेशनमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री बनणार?
3 ममतांचे सरकार कार्यकाळ पूर्ण करु शकणार नाही – विजयवर्गीय
Just Now!
X