News Flash

शपथविधी सुरु असतानाच दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक, बीफ रेसिपी केली पोस्ट

हॅकर्सनी वेबसाईटच्या होमपेजवर गोमांस म्हणजेच बीफ रेसिपी पोस्ट केली

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पण एकीकडे राष्ट्रपती भवनात शपथविधी सुरु असताना दुसरीकडे दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. यावेळी हॅकर्सनी वेबसाईटच्या होमपेजवर गोमांस म्हणजेच बीफ रेसिपी पोस्ट केली. या रेसिपीसोबत Hacked by ‘Shadow_V1P3R’ असा मेसेजही लिहिण्यात आला होता.

वेबसाईटच्या होमपेजवर एका बीफ डिशचा फोटो पोस्ट करण्यात आला होता ज्याच्याखाली ‘बीफ फ्राय’ असं लिहिण्यात आलं होतं. या फोटोच्या खाली बीफची संपुर्ण रेसिपी पोस्ट करण्यात आली होती. याशिवाय नॅव्हिगेशन बारसोबतदेखील छेडछाड करत भाजपाऐवजी बीफ लिहिण्यात आलं होतं.

उदाहरणार्थ ‘About BJP’ ऐवजी ‘About Beef’ तर ‘BJP History’ ऐवजी “Beef History’ असा बदल करण्यात आला होता. होमपेजवरील इतर कोणत्या गोष्टीत मात्र बदल करण्यात आला नव्हता. काही वेळाने वेबसाईट पुर्ववत झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 9:21 am

Web Title: delhi bjp website hacked beef recipe posted
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
2 मोदी मंत्रिमंडळात शहा, जयशंकर
3 Narendra Modi Ministry 2.0 : नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री
Just Now!
X